राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको विभागातर्फे प्रभाग क्र.२९ मधील गणेश चौकातील मनपा हायस्कूलसंदर्भात विभागीय अधिकारी मयूर पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, या ठिकाणी कामगार वसाहत आहे. वंचितांसाठी शाळा उभारण्यात आली आहे. येथे स्मार्ट स्कूलसारखी संकल्पना राबविल्यास कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल. नुकतेच या शाळेत व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपाने रुग्णालय उभारावे; पण त्यासाठी अन्यत्र जागा शोधावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, विभागीय अध्यक्ष मकरंद सोमवंशी, प्रदेश सदस्य मुक्तार शेख, पुष्पा राठोड, डॉ. ज्योती पाटील, रवींद्र शिंदे, राहुल कमानकर आदी उपस्थित होते.
(फोटो १८ एनसीपी) - विभागीय अधिकारी मयूर पाटील यांना निवेदन देताना बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी, मुक्तार शेख, पुष्पा राठोड, डॉ. ज्योती पाटील, रवींद्र शिंदे, राहुल कमानकर आदी.