शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

मजूर मिळेना; लागवड होईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 10:55 PM

आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देयेवला तालुका : कांदा उत्पादकांवर भटकंतीची वेळ

जळगाव नेऊर : आसमानी आणि सुलतानी संकटांतून सावरतो ना सावतो तोच मजूरटंचाईचे संकट उभे ठाकल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात मजुरांच्या शोधार्थ गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तालुक्यात कांदा लागवड लांबण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केले आहे.अवकाळी व परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातल्याने शेतपिकांसह कांदा रोपे सडली. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा बियाणे टाकली. यामुळे कांदा लागवडीचा कालावधी वाढला आहे. आता एकाचवेळी तालुकाभरात कांदा लागवडीला वेग आल्याने मजुरांची टंचाई भासत आहे. त्यात ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा रोपे सडण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.लागवड आणि कांदा काढणी ही कामे एकाच वेळी आल्याने मजुरांना सुगीचे दिवस आले आहे. ऐन हंगामात मजूर मिळवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकºयांना गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे.ठिबक, तुषार सिंचनावर भर४शासनाने प्रथमच ठिबक, तुषार सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनावर कांदा लागवड केली आहे. यामुळे काही प्रमाणात मजुरांची कमी भासत नाही. तसेच सिंचनामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ लागवडीसाठी

उन्हाळ कांद्यापाठोपाठलाल कांद्यालाही चांगला दर मिळत आहे. बाजारभाव तीन-साडेतीन हजारांवर स्थिर राहिल्याने शेतकºयांच्या पदरात चार पैसे पडत आहे. लाल कांद्याचे भांडवल उन्हाळ कांदा लागवडीसाठी वापरले जात आहे. लाल कांद्यासाठी वापरलेले खते, औषधेही उन्हाळ कांद्यासाठी वापरले जात आहेत.पालखेड डावा कालव्याचा आधारमजुरांअभावी कांदा लागवड उशिराने होत असली तरी पालखेड डावा कालव्याचे रब्बी सिंचनासाठी दोन आवर्तन मिळणार असल्याने उशिराने होणºया कांदा लागवडीला याचा आधार आहे. पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी अशा शेतकºयांना आहे. लागवड उशिरा होणार असली तरी पिकास भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे, असे शेतकºयांनी सांगितले.मी पाच ते सात वर्षांपासून ठिबक सिंचनावर कांदा, टमाटा पीक घेत आहे. वेळेची बचत होऊन कमी मेहनतीत आतापर्यंत चांगले उत्पादन मिळाले आहे. तसेच शासनाने ठिबक सिंचनावर ८० टक्के अनुदान दिल्याने मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत झाली आहे. तसेच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले आहे.- रावसाहेब चव्हाणके, कांदा उत्पादक,

कांद्याची रोपे खराब होऊ लागल्याने व मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथून खासगी वाहनाने मजुरांची वाहतूक करावी लागली. त्यानंतर कांदा लागवड केली. त्यामुळे खर्चातही वाढ झाली. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने कर्जातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.- साहेबराव झांबरे, कांदा उत्पादक

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा