शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 7:01 PM

एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत.

ठळक मुद्देगुगल प्ले-स्टोअरवर ‘माय फास्टटॅग’वाहनांच्या लांबच लांब रांगा यापुढे दिसणार नाही

नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पध्दतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रक्कमचा भरणार करून वाहनचालकांना टोलनाक्यांवर न थांबता तत्काळ स्वतंत्र लेनमधून मार्गस्थ होता येईल. यासाठी मोटारीच्या आतील बाजूने चालकाच्या जवळ एक विशिष्ट प्रकारचे ‘फास्टस्टॅग स्टिकर’ लावणे बंधनकारक राहणार आहे.देशाचे इंधन आणि नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (ईटीसी) २०१६साली सुरू केले गेले होते. अलिकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेदेखील ईटीसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. तसेच वाहनचालकांना माहितीपत्रकांचेही वाटप करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, घोटी टोलनाक्यावर सुमारे १० हजार, पिंपळगाव टोल नाक्यावर ३५ हजार फास्टस्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक आॅनलाइन टोल पेमेंटमुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा यापुढे दिसणार नाही, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.---गुगल प्ले-स्टोअरवर ‘माय फास्टटॅग’फास्टॅग स्टिकर कोणत्याही टोलनाक्यावर, पेट्रोल पंप, बॅँक क ाउंटरकडून सहज उपलब्ध होऊ शकेल, असा दावा एनएचएआयकडून करण्यात आला आहे. फास्टॅग खरेदी केलेल्या वाहनचालकाच्या बॅँक खात्यातून किंवा आॅनलाइन पेमेंट खात्याच्या वॉलेटसोबत फास्टटॅग जोडलेला असेल, त्यामुळे ते स्टिकर चिकटविलेले वाहन जेव्हा टोलनाक्यावरील विशिष्ट लेनमध्ये येईल तेव्हा स्वयंचलित यंत्रणेमार्फत वाहनापुढील बार खुला होईल आणि वाहन सहजरित्या पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ होईल, असा दावा पाटील यांनी बोलताना केला. गुगलवर ‘माय फास्टटॅग’ नावाचे अ‍ॅपदेखील उपलब्ध आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNational Highwayराष्ट्रीय महामार्गtollplazaटोलनाका