नाशिक- गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शनिवारी (दि.१३) त्यात अल्पसा दिलासा मिळाला. दिवसभरात१७८ रुग्ण बरे झाले तर नव्याने १३९ बाधित आढळले आहेत. तर दुसरीकडे शनिवारीच जिल्ह्यात एकाही बाधिताचा मृत्यू न झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. देान दिवसांपूर्वी तर एकाच दिवसांत तीनशे रूग्ण आढळले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण होते. परंतु शनिवारी मात्र त्यात काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात १७८ रुग्ण बरे झाले तर १३९ बाधित आढळले आहेत. तर एकाचाही मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात सध्या १ हजार २३६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरातील ५९४, तर ग्रामीण भागातील आणि मालेगाव महापालिका क्षेत्रातील १७१ रुग्णांचा समावेश आहे. १४ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.