नाशिक : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटावा यासाठी कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतर्गत मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप केेले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ३६,९१,२१८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू, २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्यव्यतिरिक्त ३ किलो गहू, २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. याच योजनेंतर्गत दोन्ही गटांतील लाभार्थ्यांना १ किलो प्रतिकार्ड याप्रमाणे चनाडाळ किंवा तूरडाळ वाटप केले जाणार आहे.
--इन्फो--
जिल्ह्यातील एकूण कार्डधारक
१२२८३२९
--इन्फो--
बीपीएल : ५८५३५१
अंत्योदय: १७२३४८
केशरी : ४७०६२९
-=-इन्फो--
काय मिळणार
गहू
३ किलो
तांदूळ
२ किलो
--इन्फो--
बीपीएलच्या
८५८९५४
सदस्यांना लाभ
--इन्फो--
त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड तर प्राधान्यक्रम कुटूंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू, २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रती लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे.
--इन्फो--
केशरीच्या २१८४४०२ सदस्यांना मिळणार लाभ
केशरी कार्ड असलेल्याांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता या सर्व कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ होणार आहे. पिवळे, केशरी आणि बीपीएल कार्डधारकांना या याेजनेचा थेट लाभ हेाणार आहे. मे महिन्यात सुरू झालेले असून मदत वाढल्यास जूनमध्येदेखील कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ होणार आहेे.
---केाट--
रेशनदुकानांवर ९५ टक्के धान्य पोहोचले
काेरेाना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मे २०२१च्या अन्नधान्याचे मोफत वाटप करण्याच्या घाेषणेनुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३६ लाख लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २६०२ रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून मोफतचे गहू, तांदूळ पाेहोचले असून त्यांचे वाटप सुरू आहे. ९३ टक्केच्या पुढे दुकानांमध्ये धान्य उपलब्ध आहे.
- अरविंद नरसीकर, धान्य पुरवठा अधिकारी.