शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

शाळा नाही, तर शुल्कही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 6:05 PM

कोरोना संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीतून कमी करण्यात आल्याने बेरोजगार झाले असून, अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्देपालकांची भूमिका शालेय शुल्क माफ करण्याची मागणी

नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीतून कमी करण्यात आल्याने बेरोजगार झाले असून, अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसल्याने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.'शाळा नाही, तर शुल्कही नाही' अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचा उद्रेक सुरूच आहे. या कालावधीत महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊनच्या सत्रात सर्व शाळा, कॉलेज ही बंद ठेवली. त्यामुळे अनेक पालकांचे व्यवसाय व उद्योग ठप्प झाले आहे. बहुतांश पालकांना नोकरीवरून कमी केले असून, काहींना पगारही मिळत नाही. त्यामुळे जवळपास सर्वच पालकांना याचा मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा असून, पालकांची परिस्थिती हालाकीची व अडचणीची झाली आहे. पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळेने फी माफ करावी या संदर्भात बाल विद्या प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्याध्यापक व विश्वस्त मंडळाकडे निवेदन देत शाळेकडून आकारले जाणारे शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शाळा बंद असलेल्या कालावधीतील बस व व्हॅन यांचीदेखील फी आकारण्यात येऊ नये, अशी मागणी पालक अ‍ॅड. अमोल घुगे, एस. ए. दीक्षित, ज्योती कोळी, इब्राहिम अत्तार, अ‍ॅड. किरण वांद्रे, सुमंत वैद्य, पूनम राऊत, पूनम ठाकूर, शांताराम शेवाळे, माधुरी मोझर, समिर तांबट, अंजली सोनजे, मयुरी सोनवणे आदी पालकांनी निवेदनाचा माध्यमातून केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा