नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत. नाशिक जिल्ह्यात शनिवारी लसीकरण प्रक्रियेच्या प्रारंभाच्या दिवशी १३०० जणांना लस देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असताना प्रत्यक्षात केवळ ७४५ जणांनीच लस घेतली. लस न घेतलेल्यांमध्ये काहींनी पुढच्या टप्प्यात घेण्याचे कारण देत तर काहींनी प्रकृतीच्या कारणास्तव लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पुढील लसीकरणावेळी कर्मचाऱ्यांनी लसीकरण टाळणे, पुढील टप्प्यात करण्याची विनंती करणे किंवा प्रकृतीच्या कारणास्तव लसच टाळण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केला.शनिवारी लस दिलेल्या ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ १० जणांना लसीकरणाचा किरकोळ त्रास झाला होता. मात्र, लस दिल्यानंतर संबंधित प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जात असल्याने त्याच वेळेत थोडासा त्रास झालेल्यांवर त्वरित उपचार करण्यात आल्याने ते लगेचच सामान्य स्थितीत परतले होते. त्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस संबंधितांना स्वत:बाबत दक्ष राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यापैकी किंवा अन्य कुणालाही कोणताही त्रास नसल्यामुळे या लसीबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसह संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
जिल्ह्यात लसीकरण केलेल्या रुग्णांवर नाही गंभीर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:32 AM
नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम ...
ठळक मुद्देजिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत.