शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

ना तांत्रिक प्रशिक्षण, ना यंत्रसामग्रीचे दर्शन!

By श्याम बागुल | Published: August 31, 2019 1:30 AM

महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे.

बचतगटांचे पोषण की कुपोषण?नाशिक : महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे. गावपातळीवर पोषण आहार बनविताना त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व तांत्रिक प्रशिक्षण असल्याशिवाय बचतगटांना ठेका घेता येणार नसल्याने शासनाच्या निविदेला प्रतिसाद मिळण्याविषयी जाणकारांकडून शंका घेतली जात आहे.गावपातळीवर महिला बचत- गटांना पोषण आहाराचा ठेका देताना ग्रामपंचायत हे एक युनिट गृहीत धरून निविदा काढण्यात येणार असून, एका ग्रामपंचायतीत एक पेक्षा अधिक अंगणवाड्या असतील तर पुरवठादार मात्र एकच राहील अशी अट घालण्यात आली आहे. याशिवाय पोषण आहार तयार करण्यासाठी महिला बचतगटांकडे विविध प्रकारची यंत्रसामग्री असणे आवश्यक केली आहे. अशी यंत्रसामग्री असल्याशिवाय बचत- गटांना निविदाप्रक्रियेत सहभागीच होता येणार नाही. याशिवाय अंगणवाडीतील बालके, गरोदर व स्तनदा मातांना शासन मानांकनानुसार पुरविण्यात येणाºया पोषण आहाराचे उत्पादन हे स्वत: महिला गटाचे असणे आवश्यक करण्यात आले आहे. निविदेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाºया महिला बचतगटासाठी मात्र एक वर्षेे व जास्तीत जास्त दोन वर्षांपर्यंतच हा ठेका कायम ठेवण्यात येणार असून, त्यानंतर मात्र नव्याने निविदा काढण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. मुळात एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक ते दोनच अंगणवाड्या असून, निविदेनुसार एका बचतगटाला पाच अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे निविदेसाठी पात्र ठरण्यासाठी बचतगटांना शेजारच्या गावातील अंगणवाडीचा आधार घ्यावा लागणार आहे; परंतु जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व रस्त्यांची अवस्था पाहता अंगणवाड्यांच्या वेळेत पोषण आहाराची वेळ पाळली जाईलच याची शाश्वती कोण देणार? शिवाय पोषण आहार बनविण्यासाठी पल्वलायझर, क्लिनिंग मशीन (चाळणा), क्लिनिंग मशीन (डीसट्रोनर), रोस्टर, ब्लेंडर, अ‍ॅल्युमिनियम ट्रे, पॅकिंग मशीन, वेर्इंग मशीन, डिस्टोनर, एक्स्टूडर, कुलर आदी यंत्रसामुग्रीचे नावे महिला बचत गटाने पहिल्यांदाच ऐकली आहेत. लाखो रुपये खर्चाच्या ही सामुग्री असल्याशिवाय बचतगटांना निविदेत भाग घेता येणार नाही.मुळात शासनाने अशी यंत्रसामग्री पोषण आहार बनविण्यासाठी लागेल याची कोणतीही माहिती बचत गटांना दिलेली नाही. त्यामुळे निव्वळ निविदा भरण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची मानसिकता बचत- गटाची नसून, एकवेळबचतगटांनी यंत्रसामग्री खरेदी जरी केली तरी, त्यांना ठेका मिळेलच याची शाश्वती काय हा प्रश्न अधांतरित आहे.शिवाय बचतगट हे ग्रामीण भागातील असून, त्यात सर्वसामान्य व अर्धशिक्षित महिलांचा समावेश आहे. पोषण आहारासाठी लागणाºया यंत्रसामग्रीची त्यांना माहिती तर नाहीच, परंतु ती हाताळण्याचे कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. (क्रमश:)मुस्कटदाबीच करण्याचा प्रयत्नसर्वबाबतीत अनभिज्ञ असलेल्या महिला बचत गटांना पोषण आहाराचा ठेका देण्याचा शासनाचा हेतूू वरकरणी शुद्ध वाटत असला तरी, निविदेत तांत्रिक बाबींचा अधिकाधिक वापर करून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबीच करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिला गटांना खरोखर सक्षम करण्याचा हेतू शासनाचा असेल तर न्यायालयाचा निर्णय होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला, या काळात महिला बचत गटांना या सर्व बाबींची कल्पना व प्रशिक्षण देण्यास काय हरकत होती, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा