लसीकरण करण्यास सुरूवात झाली असून या वयोगटातील कोमॉर्बिड नागरिकांनी
लसीकरणासाठी येतांना पुरावा जवळ बाळगावा अन्यथा लसीकरण होणार नाही असे मार्गदर्शक तत्वे घालून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे
यांनी दिली आहे.
या संदर्भात मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरणासाठी जाण्यापूर्वी नाश्ता किंवा जेवण करून नियमित औषधे घेण्यात यावीत. ६० वर्ष वय पूर्ण असलेल्या व्यक्तींनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इत्यादी मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ४५ ते ६० वयोगटातील उच्च रक्तदाब, डायबेटीस व इतर गंभीर आजार असणाऱ्या कोमॉर्बिड नागरिकांनी लसीकरणाच्या वेळी येताना विहित नमुन्यातील स्वत:स असे आजार असल्याचे पुरावे सोबत आणणे गरजेचे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बाटली व सोबतीला तरुण नातेवाईक आणि नियमित सुरू असलेली औषधे सोबत ठेवावीत. लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची मर्यादा लक्षात घेता दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहनही डॉ. रावखंडे यांनी केले आहे.