शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

यंदा पाणीकपात नाही !

By admin | Published: October 28, 2016 11:24 PM

मुबलक साठा : जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय

नाशिक : बरोबर वर्षभरापूर्वी मराठवाड्यातील जायकवाडीला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद पेटलेला होता. धरणातील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने ९ आॅक्टोबरपासूनच शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू केली होती. १ ते ५ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला, परंतु न्यायालयाच्या आदेशामुळे आंदोलकांची कोंडी झाली. त्यानंतर जुलै २०१६ अखेरपर्यंत नाशिककरांनी पाणीकपातीचा सामना केला. यंदा, मात्र गंगापूर धरणसमूहात ९५ टक्के पाणीसाठा असल्याने आणि मराठवाड्यात वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतल्याने नाशिककरांना मागीलवर्षाप्रमाणे पाणीकपातीला सामोर जावे लागणार नाही. सन २०१५ मध्ये सप्टेंबरअखेर गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे महापालिकेने ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घोषित केला व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली होती. महापालिकेने पाणीबचतीसंदर्भात नियोजन करताना मनपाचे जलतरण तलावही बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. महापालिकेकडून पाणीकपात सुरू झालेली असतानाच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निर्देशानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश दिला आणि तेथूनच पाणीप्रश्न अधिकच पेटला. शेतकऱ्यांची आंदोलने, धरणावर ठिय्या, आमदारांच्या घरासमोर घंटानाद अशी आंदोलने झालीत. पाणी आरक्षणाची बैठकही लांबवण्यात आली. अशा साऱ्या वातावरणात जलसंपदा मंत्रालयाने महापालिकेच्या पाणी आरक्षणात कपात करत गंगापूरमधून २७००, तर दारणातून ३०० दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. त्यामुळे पाणीकपात वाढविण्याशिवाय महापालिकेपुढे पर्याय उरला नाही. पुढे जुलै २०१६ अखेरपर्यंत महापालिकेने आठवड्यातून दोन वेळा पाणीकपात करत पुरून-पुरून पाणी वापरले. (प्रतिनिधी)गंगापूर धरणात ९३ टक्के पाणीसाठाशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ आॅक्टोबर अखेर ५२३३ दलघफू म्हणजे ९३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७० टक्के होता, तर समूहातील कश्यपी धरणात यंदा ९९ टक्के, गौतमी गोदावरीत ९३ टक्के, आळंदी धरणात १०० टक्के आणि दारणा धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीचे संकट नाही. महापालिकेने यावर्षी गंगापूर धरणातून ४२००, तर दारणातून १०० दलघफू पाणी आरक्षण मागितले होते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत गंगापूर धरणातील ३९०० तर दारणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. महापालिकेमार्फत शहरात रोज ४१० दसलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणीकपातीचे संकट झेलणाऱ्या नाशिककरांवर मात्र यंदा वरुणराजा मेहरबान झाला आणि आॅगस्टमधील पावसानेच धरणे भरली गेली. परतीच्या वेळी पावसाने मराठवाड्यावरही कृपावृष्टी केल्याने जायकवाडीसह बहुतांश धरणे ८० टक्क्यांवर भरली. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तोच मागील वर्षी २८ आॅक्टोबरअखेर अवघा ६ टक्के इतका होता. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने यंदा गंगापूरमधून पाणी न सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. यंदा गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याने पाणीकपातीचे संकटही दूर झाले आहे.