नाशिक : उत्तर महाराष्टÑातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या दि नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी बॅँकेचे यापूर्वी सर्वेसर्वा असलेल्या (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालकांकडेच बॅँकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपविल्या आहेत. बागमार यांच्या पश्चात माजी आमदार वसंत गिते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने २१-० असा दणदणीत विजय मिळवला. शर्थीचे प्रयत्न करूनही सहकारला मतदारांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तर बागमार मामांचा वारस म्हणून मैदानात उतरलेल्या अजित बागमार यांच्या नेतृत्वाखालील ‘नम्रता’लाही मतदारांनी साफ नाकारले.अंतिम निकाल सायंकाळी ५ वाजता घोषित करण्यात आला. त्यानुसार प्रगतीच्या सर्व उमेदवारांनी बाजी मारली. यात सोहनलाल मोहनलाल भंडारी (२९,०५४), महेंद्र मूळचंद बुरड (२५,६९७), भानुदास भानुदास चौधरी (२४,५५२) शिवदास मोहनलाल डागा (२८,१५९), प्रकाश मोतीलाल दायमा (२८,८६५), संतोष मांगीलाल धाडीवाल (२५,३११), यांना याप्रमाणे मते मिळाली आहेत. तसेच हेमंत हरिभाऊ धात्रक (२९,१५२), गणेश बबन गिते (२६,६८९), वसंत निवृत्ती गिते (३२,४६८), अविनाश मूळचंद गोठी (२७,०२४), कांतीलाल भागचंद जैन (२६,९३०), हरिष बाबुलाल लोढा (२६,८०५), सुभाष चंपालाल नहार (२७,०१३), नरेंद्र हिरामण पवार (२६,४३२), प्रफुल्ल बुधमल संचेती (२६,५६८), विजय राजाराम साने (२६,५७३), अशोक श्रावण सोनजे (२४,९८३), रंजन पुंजाराम ठाकरे (२६,८९०) याप्रमाणे मते मिळाली आहेत. महिला गटात प्रगती पॅनलच्या शोभा जयप्रकाश छाजेड (३४,१०८) आणि रजनी जयप्रकाश जातेगावकर (३०,८१५) यांनी बाजी मारली. अनुसूचित जाती-जमाती गटात प्रगतीचे प्रशांत अशोक दिवे (३१,१७२) विजयी झाले आहेत.याच निवडणुकीत पराभूत सहकार पॅनलचे किशोरकुमार सुवालाल बाफणा (१९,२८८), किसनलाल कन्हैयालाल बंब (१७,८०८), ईश्वरालाल धोंडीराम बोथरा (१७,६५४), अजयकुमार जव्हेरीलाल ब्रह्मेचा (२०,३९८), सुनील मोतीलाल बूब (१८,१३६), मधुकर भाऊराव हिंगमिरे (१७,८४९), सुनील रघुनाथ केदार (१७,६३५), भास्कर कृष्णा कोठावदे (२१,८२६), सचिन विनोद कोठावदे (१८,३७५), शरद नामदेव कुटे (१९,२०६), डॉ. शरदश्चंद्र निवृत्ती महाले (१९,८४५), संतोष चंदुलाल मंडलेचा (१९,३२६), ललितकुमार जवरीलाल मोदी (२०,५७८), नंदलाल सुंदरलाल पारख (१८,४२०), सुरेश अण्णाजी पाटील (१८,९०२), गजानन दामोदर शेलार (२३०५५), अनंता देवराम सूर्यवंशी (१६,६७९), अशोक धोंडू व्यवहारे (१७,८६१) याप्रमाणे मते मिळाली आहेत.महिला गटात सहकार पॅनलच्या रेखा कैलास भुतडा (२०,८३२) आणि सोनल संदीप मंडलेचा (१९७९३), तर राखीव गटात मनोहर त्रिभुवन (२०,७५४) याप्रमाणे मते मिळाली.नम्रता पॅनलच्या पराभूत उमेदवारांना मिळालेली मते : दत्तात्रेय काळू अमृतकर (४००१), मुबीन हनीफ अन्सारी (३०६०), अजित हुकूमचंद बागमार (९०००), महेश देवबा भामरे (४३३१), अनिल दत्तात्रेय भोर (४१९७), चंद्रभान बाबूराव बोरस्ते (४८२१), सुरेश लक्ष्मण दंडगव्हाळ (३८८१), नितीनकुमार धनराज ललवाणी (३६२६), संजय मोतीलाल नावंदर (३३५४), भास्कर दत्तात्रेय निकम (३४८८), शिवाजी बाबूराव पालकर (३५९५), महेश बबन पठाडे (२७८४), दिलीप मनोहर पवार (४४११), संजय बबनराव सानप (४११८), श्रीकृष्ण भिला शिरोडे (३५८६), सचिन सुभाषचंद्र सूर्यवंशी (२९७९), श्रीधर वसंतराव व्यवहारे (३८८५), संदीप दलपत वालझाडे (३७१३) याप्रमाणे मते मिळाली.महिला गटात ज्योती राजेंद्र बागमार (७०५३) आणि प्रज्ञा नंदू सावंत (४३२४) याप्रमाणे मते मिळाली आहेत. यातील ज्योती बागमार या हुकूमचंद बागमार यांच्या स्नुषा आहेत. पॅनलचे अनुसूचित जाती जमाती गटातील उमेदवार हरिभाऊ बाबूराव लासुरे (७५८०) पराभूत झाले.निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत चित्र स्पष्ट झाले होते. त्यामुळे सहकार पॅनलचे गजानन शेलार यांच्या विजयाची अपेक्षा ठेवून असलेले अन्य उमेदवार आणि समर्थक मात्र नंतर माघारी परतले.पराभूत शेलार यांचे २१ हार आणि नंतर ‘प्रहार’सहकार पॅनलचे नेते गजानन दामोदर शेलार यांनी अखेरपर्यंत लढत दिली. परंतु त्यांचे मताधिक्क्य घटत गेले आणि सर्वसाधारण गटातील १८ जागांवर प्रगती पॅनल बाजी मारत असल्याचे दिसल्यानंतर शेलार यांनी २१ मोठे पुष्पहार मागविले. त्यानंतर ते सर्व विजयी उमेदवारांना स्वहस्ते दिले आणि दिलदारपणा दाखविला. अर्थात नंतर माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी हा जनशक्तीच्या विरोधात धनशक्तीचा विजय असल्याचे सांगत प्रगती पॅनलवर प्रहार केला.विश्वासाला तडा जाऊ देणार नाही..नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक कौल देत फार मोठा विश्वास प्रगती पॅनलवर व्यक्त केला आहे. या विश्वासाला नवनिर्वाचित संचालक कदापिही तडा जाऊ देणार नाही. सहकारातील माझे गुरू (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली आजवर बॅँकेत केलेल्या कामाची ही पावती आहे. यापुढेही बॅँकेतील केवळ व्यापारीच नव्हे तर सर्वसामान्य विक्रेते, महिला आणि अन्य सभासदांसाठी अहोरात्र झटून बॅँकांचा विकास करणार आहे. प्रशासकीय कारकिर्दीत अन्य बॅँकांमध्ये गेलेली खाती पुन्हा नामकोकडे वळविण्यास प्राधान्य राहील. वाढीव एनपीए कमी करतानाच या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज देण्याची सुविधा बॅँक देईल त्यासाठी उपनियमावलीत आवश्यक ते बदल केले जातील. विरोधकांनी अकारण आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे आणि पराभव पचवायला शिकले पाहिजे.- वसंत गिते, प्रवर्तक प्रगती पॅनलहा धनशक्तीचा विजय...हा जनशक्तीच्या विरोधातील धनशक्तीचा विजय आहे. असे असले तरी नामको बॅँकेच्या निवडणुकीत निवडून आलेलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करतो, येणाºया कालावधीत त्यांनी बॅँकेचे चांगले कामकाज करावे. कामकाजात सुधारणा कराव्या आणि ग्राहकांची सेवा करावी. त्याचबरोबर कर्मचाºयांचे वेतन आणि प्रश्न सोडावावेत.- गजानन शेलार, प्रवर्तक सहकार पॅनल गिते-छाजेड यांना सर्वाधिक मते...या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार शोभा जयप्रकाश छाजेड यांना सर्वच उमेदवारांत सर्वाधिक म्हणजेच ३४,१०८ मते मिळाली. त्यांनी सर्वाधिक मते मिळवण्याची यानिमित्ताने हॅट््ट्रिक केली आहे. याच पॅनलचे नेते वसंतराव गिते यांना सर्वसाधारण गटात सर्वाधिक (३२,४६८) मते मिळविली आहेत. राखीव गटातील उमेदवार तथा नगरसेवक प्रशांत दिवे यांनी प्रथमच निवडणूक ३१ हजार १७२ मते मिळविली आहेत.
नामको बॅँकेत प्रगती पॅनलची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:35 AM
नाशिक : उत्तर महाराष्टÑातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या दि नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदारांनी बॅँकेचे यापूर्वी सर्वेसर्वा असलेल्या (कै.) हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखाली माजी संचालकांकडेच बॅँकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपविल्या आहेत. बागमार यांच्या पश्चात माजी आमदार वसंत गिते आणि सोहनलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनलने २१-० असा दणदणीत विजय मिळवला.
ठळक मुद्देनिवडणूक : सर्व जागांवर कब्जा; सहकार, नम्रता पॅनल चारीमुंड्या चित