नाशिक : अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनियर कॉलेज यांना अनुदान पात्र घोषित करून 20% अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे 6 आॅगस्ट पासुन आंदोलन सुरू कृतीसमीतीच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह काही संस्थाचालकांनीही सोमवारी (दि.26) त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्रा राज्य विनाअनुदानित शाळा कृती समीतीने आपल्या मागण्यांकडजे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी सोमवारी बिटको कॉलेज पासुन विभागीय आयुक्त कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालयावर घोषणा देत अर्धनग्न मोर्चा काढून विभागीय उपायुक्त प्रतिभा संगमनेरे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना आपल्या प्रलंबि मागण्यांचे निवेदन दिले. अर्धनग्न मोर्चात समितीचे राज्य सचिव गोरख कुळधर, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब ढोबळे, कार्याध्यक्ष कांतीलाल नेरे, नाशिक जिल्हाध्यक्ष भरत भामरे , उदय तोरावने, राजाराम गायकवाड, मनोज वाकचौरे , सोमनाथ जगदाळे, बाबासाहेब खरोटे शरद काकुस्ते, कैलास पोरजे ,हरिश्चंद्र शेजवळ , कन्हैया पगार, अविनाश कांगणे , माधव भुजाडे, अभिजित नेरकर, निकिता पवार , राकेश निकम,अरुणा सुतार , निशा पाटील ,मनीषा पवार, सविता देसले, सोनल पाटील आदी सहभागी होते.
शाळा अनुादानासाठी विनाअनुदानित कृती समिताचा नाशकातून अर्धनग्न मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 9:49 PM
अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनियर कॉलेज यांना अनुदान पात्र घोषित करून 20% अनुदान द्यावे आदी मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे 6 आॅगस्ट पासुन आंदोलन सुरू कृतीसमीतीच्या शिक्षक, शिक्षणेत्तर कर्मचाऱ्यांसह काही संस्थाचालकांनीही सोमवारी (दि.26) त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला.
ठळक मुद्देशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह संस्थाचालकांकडून सरकारचा निषेध विनाअनुदानित शाळांना किमान 20 टक्के अनुदानाची मागणी 20 टक्के अनुदानित शाळांचे अनुदान वाढविण्याची मागणी