लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनापाठोपाठ आलेल्या म्युकरमायकोसिसच्या आजाराची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे. येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले असून, त्यातील ४८८ रुग्णांवर उपचार सुरू असून, ८१ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत.कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचारादरम्यान औषधांच्या अतिवापरामुळे अनेकांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. सरकारी पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे चिंतेत भर पडली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले आहेत. यातील २७९ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. ८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४८८ रुग्ण उपचार घेत आहेत.५४२ रुग्ण नाशिकमध्ये आढळले असून, त्यातील २०५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत, तर ५७ जणांचा मृत्यू झाला. सध्या २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धुळे जिल्ह्यात ११० रुग्ण आढळले असून, त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात ६३ पैकी ४७ रुग्ण उपचार घेत दोघे बरे झाले.
डॉक्टरांचा सल्ला न जुमानता रुग्ण घरीम्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी औषधे आणि सरकारी रुग्णालयात उपचार होत असले तरी रुग्णांना खर्च परवडत नाही. याच कारणामुळे उत्तर महाराष्ट्रातील आठ रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच घरी परतल्याची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे.