सायखेडा : उत्तरा नक्षत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने सगळीकडे हजेरी लावल्याने परिपक्वतेच्या अंतिम टप्प्यात आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. द्राक्ष पीक धोक्यात आले आहे. यंदा जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. मृग नक्षत्रापासून सुरु झालेला पाऊस सलग दोन महिने बरसत राहिला. पंधरा दिवसांची विश्रांती घेऊन उत्तरा नक्षत्र सुरु होताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. पंधरा दिवसांपासून बेभान होऊन बरसत असलेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची अखेर वाट लावली आहे. टमाटे, शिमला, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला, या पिकांची नासाडी झाली आहे तर अनेक ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने पिके वाहून गेले आहे. फळवर्गीय पिकांची फुले, कळी कुजून गेली आहे. अति प्रमाणात पाऊस आणि पहाटे पडणारे दव यामुळे करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पिकांची पाने गळून पडत आहे. खराब झालेली पाने पडल्याने पीक वाया जाते.
उत्तराच्या पावसाने शेतकरी धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 4:35 PM