शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

घोषणांची नव्हे; आर्थिक निकषांची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:05 PM

ओझर : आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडलेल्या निसाकाची चाके पुन्हा फिरण्यासाठी केवळ बैठका, पत्रकार परिषद अथवा आंदोलन पुरेसे नसून त्यासाठी आर्थिक निकषांचा टप्पा पार करण्याच्या क्षमतेचा आहे. असे असताना नुकतीच पार पडलेली सर्वपक्षीय बैठक नुसता फार्स ठरू नये, अशा प्रतिक्रिया आता निसाका परिसरात उमटू लागल्या आहेत.

ठळक मुद्देमागोवा : निसाकासाठी घेतलेली सर्वपक्षीय बैठक केवळ फार्स न ठरण्याची अपेक्षा

सुदर्शन सारडा ।लोकमत न्यूज नेटवर्कओझर : आर्थिकदृष्ट्या कचाट्यात सापडलेल्या निसाकाची चाके पुन्हा फिरण्यासाठी केवळ बैठका, पत्रकार परिषद अथवा आंदोलन पुरेसे नसून त्यासाठी आर्थिक निकषांचा टप्पा पार करण्याच्या क्षमतेचा आहे. असे असताना नुकतीच पार पडलेली सर्वपक्षीय बैठक नुसता फार्स ठरू नये, अशा प्रतिक्रिया आता निसाका परिसरात उमटू लागल्या आहेत.मागील वर्षी आचारसंहितेपूर्वी झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निसाका बाबतीत दिलेले आश्वासन शेतकऱ्यांच्या मनात इतके बसले की, निफाडमध्ये सत्तापरिवर्तन झाले. नव्याने निवडून आलेल्या आमदारांनी प्रसिद्ध झालेल्या निविदेला त्यांच्या संस्थेमार्फत सकारात्मकता दाखवली; पण कायद्यासमोर ते टिकले नाहीत. इकडे कारखाना लवकरच सुरू होईल या अपेक्षेने तालुक्यात शेतकऱ्यांनी भरमसाठ ऊस लागवड केली. त्या दिशेने पावले पडत असताना कृती समितीने पुन्हा धार लावण्यास सुरुवात केली.दहा वर्षात याच कृती समितीने नेमकी किती ऊस लागवड केली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. आर्थिक कचाट्याच्या गाळात पूर्णपणे रुतलेल्या निसाकाला धरणे आंदोलन अथवा पत्रकार परिषदा घेऊन एकही गोष्ट साध्य होणार नाही हे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. त्याला गरज केवळ आर्थिक निकषांची लढाई असताना ती मोठ्या घोषणांमध्ये रूपांतरित झाल्याने त्याला राजकारणाची संशयित धार येणे स्वाभाविक आहे. जी कारखानदारी मालोजीराव मोगल व माधवराव बोरस्ते यांनी शिखरावर नेऊन पोहोचवली. त्या सुवर्णपदक मिळविलेल्या निसाकारूपी सोन्याचे नंतरच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोळसा झाला असेच म्हणावे लागेल.कारखाना सुरू करण्यासाठी ३०० कोटींची गरजजो कुणी कारखाना चालवण्यास घेईल त्याला किमान २५० ते ३०० कोटींची तरतूद गरजेची आहे. त्यात १०५ कोटी जिल्हा बँक देणे (मूळ १४८ कोटी),३० कोटी सेल्स टॅक्स थकीत (सूट योजनेप्रमाणे) मूळ ६० कोटी, ६५ कोटी, कारखाना पुनरुज्जीवित करण्यासाठी, १० कोटी परवाना नूतनीकरण व कामगारांची देणी, सात कोटी इतर देणी, १५ कोटी पीएफ/ग्रॅच्युईटी, ५० कोटी अ‍ॅडव्हान्स देणी असा समावेश आहे. अशात दि. २७ रोजी पिंपळगावी झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकदिलाने काम करण्याची घोषणा केली खरी; पण ती कितपत यशस्वी होते हे येणारा काळच ठरविणार आहे.निसाका बाबतीत दोन-तीन वेळेला लिलाव टेंडर काढले. त्याला पिंपळगाव येथील अशोकराव बनकर पतसंस्थेने प्रतिसाद दिला होता. पण कायद्यात पतसंस्था सहकारी कारखाना चालवण्यास घेऊ शकत नाही. बाजार समितीचे नियमदेखील तसेच आहेत. अजूनही आम्ही टेंडर काढू कारखाना कुणीही खासगीतदेखील घेऊ शकतो केवळ त्याच्याकडे तेवढे भांडवल व सरकारी नियमात सर्व बाबी असणं अनिवार्य आहे.- शेखर गायकवाड, राज्य साखर आयुक्त, पुणे

टॅग्स :OzarओझरSugar factoryसाखर कारखाने