देवळा : कोरोनाची धास्ती आणि लॉकडाउन यामुळे टमाटा खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत, आलेच तर कवडीमोल दरात विकत घेतात, यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने टमाटा रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे.वाजगाव येथील एका शेतकºयाने दर मिळत नसल्याने शेतातील तयार टमाटा रस्त्याच्या कडेला टाकून दिला आहे. कोरोनामुळे सर्वजण प्रभावित झाले आहेत. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.चालू वर्षी विहिरींना चांगले पाणी असल्यामुळे शेतकºयांनी महागड्या औषधांची फवारणी करून मोठ्या कष्टाने टमाटा पीक घेतले. दरवर्षी नियमितपणे येणारे परप्रांतीय व्यापारी कोरोनाच्या धास्तीमुळे यंदा आले नाहीत. बाजार समितीतदेखील टमाट्याला कमी दर कमी मिळत आहे, त्यात वाहतूक खर्च व मजुरीही सुटत नसल्यामुळे शेतकºयांनी रस्त्यावर टाकून दिला. रस्त्यावर फेकून दिलेला टमाट्याचा परिसरातील मेंढपाळ जनावरांना चारा म्हणून वापर करीत आहेत.टमाटा बाजारात नेताना वाहतूक खर्च परवडत नाही. व्यापारी बांधावर खरेदीसाठी आला तर शेतकºयांचा मोठा खर्च वाचतो; परंतु कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे व्यापारी खरेदीसाठी शेतावर येण्यास उत्सुक नाही. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने अडचणी दूर करून खरेदीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.- सौरभ पाटील ( टमाटा उत्पादक शेतकरी, हिंगळवाडी )
दर मिळत नसल्याने टमाटा फेकला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 6:55 PM
कोरोनाची धास्ती आणि लॉकडाउन यामुळे टमाटा खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत, आलेच तर कवडीमोल दरात विकत घेतात, यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने टमाटा रस्त्यावर फेकून देत आपला संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : देवळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात