नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. स्मृतिचित्रे या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर एकूण मराठी साहित्यात मोलाचे स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. परंपरागत रीतिरीवाजात वाढलेल्या लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव मनकर्णिका गोखले होते. त्यांचे लग्न त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. घरातील रूढी, परंपरा, चालीरीतींचा पगडा लक्ष्मीबाईंवर बालपणापासूनच होता. त्यामुळे त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. लग्न झाल्यावर नारायण टिळकांनी त्यांना जमेल त्या वेळेत स्वत: शिक्षण दिले. स्मृतिचित्रे या त्यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात त्यांनी या त्यांच्यावर झालेल्या ख्रिश्चन प्रभावाचे वर्णन केले आहे. नारायणराव टिळक हे सद्सद्विवेकी बुद्धिवादी आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा प्रभाव लक्ष्मीबाई टिळक यांच्यावर लवकरच पडला. स्मृतिचित्रे या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. त्यांचे पती रेव्ह. ना.वा. टिळक व त्या स्वत: ख्रिस्ती कशा झाल्या याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात, जातीव्यवस्था, धार्मिक विद्वेष, विचार-स्वातंत्र्यावर असलेली बंधने यांचे वर्णन आले आहे. ८ जुलै, १९०० रोजी लक्ष्मीबाईंचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश झाला. त्याशिवायही त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वस्तुसंग्रहालय बी.जी.वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहायक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.
इन्फो
महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. माणसा-माणसांत भेदभाव करण्याची दुष्ट प्रवृत्ती मनातून समूळ नाहिशी होणं हे खरं धर्मांतर. त्यानंतर, तुम्ही कोणत्या लौकिक धर्माचा स्वीकार करता ते गौण आहे. जातीधर्माची नव्हे, तर देवाची लेकरं व्हा हेच स्मृतिचित्राचे सार असल्याचे पगार यांनी नमूद केले.