शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पूर्व विभागातील ४० लेटलतिफांना नोटिसा

By admin | Published: July 11, 2017 12:20 AM

पूर्व विभागातील ४० लेटलतिफांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मागील सप्ताहात पंचवटी विभागीय कार्यालयात लेटलतिफ कर्मचाऱ्यांना महापौरांनी दणका दिल्यानंतरही मनपा कर्मचारी सुधरायला तयार नाहीत. सोमवारी (दि.१०) पूर्व विभागीय कार्यालयाला प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेट दिल्यानंतर ४० कर्मचारी लेटलतिफ आढळून आले. ‘लोकमत’ने मागील सप्ताहात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पंचवटी विभागीय कार्यालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पंचवटी विभागीय कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी २८ कर्मचारी लेटलतिफ आढळून आले होते. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले. दरम्यान, सोमवारी (दि.१०) प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी पूर्व विभागीय कार्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी हजेरी मस्टरवर ४० कर्मचारी कामावर उशिराने आल्याचे निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, अन्य विभागीय कार्यालयांनाही कधीही भेट देऊन पाहणी केली जाणार असल्याचे फडोळ यांनी सांगितले.