सायखेडा : भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर या तीन गावांच्या संयुक्त अपूर्ण पेयजल योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गिते यांनी अचानक भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंता यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.या गावांसाठी करंजगाव येथून पाइपलाइनद्वारे पाणी आणून गावातील टाकीत सोडून कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाइपलाइन, टाकी जुनी झाल्याने निलर््िाखित करून पाडण्यात आली होती. त्या ठिकाणी नवीन कामासाठी राष्टÑीय पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीत पाण्याची टाकी, पाइपलाइन, गावातील नळ पाइपलाइन, टाकीला संरक्षक भिंत, जिना अशी कामे निर्धारित करण्यात आली होती; मात्र संबंधित ठेकेदाराने संरक्षक भिंत आणि जिन्याचे रेलिंग पूर्ण न करता कामाची ८० टक्के रक्कम काढून घेतली आहे.या संदर्भात ग्रामसभेत ठराव करून काम पूर्ण करून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. संबंधित अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता ठेकेदाराला पैसे अदा केले, त्यामुळे काम अद्यापही अपूर्ण आहे.या कामाचा २० टक्के निधी अद्याप बाकी असल्याने त्या पैशात अपूर्ण काम पूर्ण करावे अशी सूचना गिते यांनी दिली; मात्र अभियंता यांच्यात एकवाक्यता नसल्याचे उघड झाले. यावेळी पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सोपान खालकर, सरपंच शोभा कमानकर, औरंगपूरचे उपसरपंच आरिफ इनामदार, गोरख खालकर, शरद खालकर आदी उपस्थित होते.
पेयजल योजना पूर्ण करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:49 PM
सायखेडा : भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर या तीन गावांच्या संयुक्त अपूर्ण पेयजल योजनेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेंद्र गिते यांनी अचानक भेट देऊन संबंधित अधिकारी, अभियंता यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीला न्याय मिळण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देभेंडाळी : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पाहणी दौरा