सातपूर : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता शहरातील गोठेधारकांवर कारवाईला प्रारंभ केला आहे. सातपूर विभागातील ८२ गाळेधारकांना नोटिसा बजावून जनावरांचे शेण मलमूत्र यामुळे अस्वच्छता होणार नाही. याची काळजी घेण्यास सूचित करण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात साधुसंत आणि भाविक दाखल होणार असल्याने जनावरांचे गोठ्यातील शेण व मलमूत्र यामुळे होणारी अस्वच्छता आणि त्यातून डेंग्यू व इतर साथींच्या आजाराची लागण होऊ नये म्हणून गोठेधारकांनी खबरदारी घ्यावी शेण आणि मलमूत्राची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्यात यावी गोठ्यातील जनावरे रस्त्यावर बांधणे अथवा मोकाट फिरू देऊ नये. गोठ्यामुळे अथवा जनावारांच्या मलमूत्रामुळे अस्वच्छता पसरल्यास संबंधित गोठेधारकाच्या विरोधात कारवाई करण्याची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बजावण्यात आली आहे.
सातपूरमधील गोठेधारकांना नोटीस
By admin | Published: December 23, 2014 10:29 PM