नाशिक : अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि.१) सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. मनपा हद्दीतील सुमारे १८१ माध्यमिक शाळांमध्ये शनिवारपासून माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत.या पुस्तिकेवरील यूजरआयडी व पासवर्डचा उपयोग करून विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग भरता येणार आहे, तर दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर भाग दोन भरता येणार आहे. परंतु, आॅनलाइन निकालापूर्वी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग एक पूर्ण भरून ६ जूनपर्यंत शाळा मुख्याध्यापकांकडून अॅपु्रव्ह करून घ्यावा अशा सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केल्या आहेत.नाशिक मनपा हद्दीतील शाळांमध्ये अकरावीसाठी बावीस हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहे. यात शहरात कला शाखेच्या चार हजार ८००, विज्ञान शाखेच्या नऊ हजार ५२०, वाणिज्य शाखेच्या सात हजार ७६०, तर कॉम्प्युटर सायन्सच्या ५६० जागांचा समावेश असून, अकरावी प्रवेशसाठी बालभारतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयास ३० हजार माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या माहिती पुस्तिका शहरातील १८१ शाळांच्या माध्यमातून १ जूनपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शाळांनी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका विक्रीसाठी वेगळे नियोजन केले असून, प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना अर्ज उलब्ध करून देताना भाग एक भरण्यासाठीही मदत केली जात आहे. विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका खरेदी केल्यानंतर त्यांना पुस्तिकेतील लॉगइन आणि आयडीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येईल. पुस्तिकेत दिलेल्या संकेतस्थळावर दहावीचा परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची सर्व माहिती पहायला मिळेल. यात अकरावी प्रवेशासाठी आरक्षण प्रवर्ग, रहिवासी पत्ता, मोबाइल नंबरसह इतर माहिती विद्यार्थ्यांना भरावी लागणार आहे. ही माहिती ६ जूनपर्यंतच भरून ती मुख्याध्यापकांकडून अॅपु्रव्ह करून घ्यावी लागेल, तर निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीत मिळालेले गुण व इतर माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या भाग दोनमध्ये निकालाची माहितीही स्वयंचलितरीत्या भरली जाणार आहे. त्या माहितीची विद्यार्थ्यांनी पडताळणी करून खात्री करून घेणे आवश्यक आहे, तर राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकालपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतर आॅनलाइन अर्जांची मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून पडताळणी करून घ्यावी लागणार असल्याची सूचना शिक्षक उपसंचालक कार्यालयाने केली आहे.असा भरा आॅनलाइन अर्जाचा भाग एक आपल्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश पुस्तिकेची माहिती पुस्तिका खरेदी करा. नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा आणि संपूर्ण प्रवेशप्रक्रिया समजून घ्या, त्यासाठी अपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या. आॅनलाइन प्रवेशासाठी आपल्या शहराचे योग्य संकेतस्थळावर जाऊन माहिती पुस्तिके तील लॉगइन आयडी अणि पासवर्डच्या साह्याने लॉगइन करा. लॉगइन झाल्यानंतर पासवर्ड बदला आणि पुढील वेळेस लॉगइन करण्यासाठी बदललेला पासवर्ड लक्षात ठेवा. पासवर्ड बदलला तरी पूर्वीचा पासवर्डही लक्षात ठेवा. सिक्युरिटी प्रश्न निवडा आणि त्यांची योग्य उत्तरे देऊन ती कायम लक्षात ठेवा. सिक्युरिटी प्रश्न व पासवर्ड याची माहिती कायम जपून ठेवा. आपला पासवर्ड इतर कोणालाही सांगू नका....या मार्गदर्शन केंद्रांवर मिळेल मदतअकरीवाच्या प्रवेशप्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही समस्या तथा अडचणींचा सामना करावा लागल्यास झोन एकमधील गंगापूररोड, जुना आग्रारोड व सारडा सर्कल पंडित कॉलनी, एस. टी. कॉलनी, प्रमोदनगर परिसरासाठी शहरातील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक महाविद्यालयात सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले असून, गंगापूरगाव, सोमेश्वर ध्रुवनगर, गणेशनगर या भागातील विद्यार्थ्यांसाठी गंगापूररोड येथील सीएमसीएस येथे मार्गदर्शन केंद्र सुरू आहे.झोन दोनमधील शरणपूररोड, टिळकवाडी, तिडके कॉलनी, गोविंदनगर सद्गुरूनगर, जुने नाशिक कॉलेजरोड, त्र्यंबकरोड, सातपूर, अशोकनगर, कामगारनगर परिसरासाठी बीवायके महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र आहे.नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात नाशिक शहरव देवलाली कॅम्प परिसरातील सीबीएससी व आयसीएसईसारख्या अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.विद्यार्थिनींसाठी नाशिकरोड व नाशिक याभागासाठी एसएमआरके महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाथर्डी फाटा व नाशिक परिसरासाठी पाथर्डी फाटा येथील जी. डी. सावंत महाविद्यालय व भगूर परिसरासाठी नूतन माध्यमिक शाळेत विशेष मार्गदर्शनकेंद्र सुरू करण्यात आले आहे.झोन तीनमधील पंचवटी, द्वारका, औरंगाबादरोड, आडगाव, या परिसरासाठी पंटवटी महाविद्यालय व मेरी, म्हसरूळ व मखमलाबाद परिसरासाठी निमाणी भागातील ए. पी. पटेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.झोन चारमधील सिडको, कामटवाडे, अंबड, पाथर्डी फाटा या भागातील विद्यार्थ्यांसाठी सिडकोतील के.एस.के.डब्ल्यूÞ. महाविद्यालय व इंदिरानगर पाथर्डीगाव व वडाळागाळ या भागासाठी सुखदेव कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू आहे.झोन पाचमधील नाशिकरोड, जेलरोड, चेहेडी, देवळालीगाव, बिटको, दत्तमंदिर, गांधीनगर, कॅनलरोड, नारायणबापूनगर या भागासाठी नाशिकरोड बिटको महाविद्यालयात तर जेलरोड, शिंदे चेहडी भागासाठी आरंभ कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.भाग एक भरताना ही काळजी घ्यासंगणकावर दिलेल्या सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने आॅनलाइन अर्ज भरा.महाराष्ट्र राज्य मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेस नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आसनक्रमांक टाकल्यानंतर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप अर्जात संलग्नित होणार आहे. आपोआप येणाऱ्या वैयक्तिक माहितीत काही चुका आढळल्यास त्यामध्ये शाळा व मार्गदर्शन केंद्रातून दुरुस्ती करून घ्यावी.ज्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरताना बैठक क्रमांक टाकल्यावर येणार नाही. त्यांनी व सीबीएसई व आयसीएसइसारख्या अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती स्वत: भरायची आहे. अर्ज शक्यतो आपली शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रातून भरून घ्यावा. आॅनलाइन अर्जाचा भाग एक संपूर्ण भरून झाल्यांतर अर्जातील स्वत:चे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, प्रवर्ग, आरक्षण, मोबाइल क्रमांक आदी माहिती अचूक असल्याचे आपल्या शाळेतून अथवा मार्गदर्शन केंद्रातून पडताळणी करून घ्या.अर्ज प्रमाणित करून घेण्यासाठी आवश्यक ते कागदपत्र दाखवा. प्रमाणित केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या व ती जपून ठेवा.जे विद्यार्थी आॅनलाइन अर्ज प्रमाणित करून घेणार नाही, त्यांचा अर्ज अपूर्ण म्हणजेच पेंडिंग राहील. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशप्र्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही. तसेच त्यांना आॅनलाइन अर्जाचा भाग दोन म्हणजे महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार नाही. त्यासाठी फार्म भरून झाल्यानंतर माय स्टेट््स तपसावे, ते प्रमाणित अॅप्रुव्ह असणे आवश्यक आहे. तरच भाग दोन भरताना महाविद्यालांचा पसंतीक्रम भरता येणार आहे.
दहावीच्या निकालापूर्वीच भाग एक भरण्याची सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:25 AM