नाशिक : इगतपुरी तालुका वैद्यकीय अधिकाºयांवर चौकशी अहवालानुसार कारवाई करावी. त्यांच्या बदलीचा प्रस्ताव शासनास सादर करावा, तसेच बैठकीला अनुपस्थित नांदगावच्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आरोग्य व शिक्षण सभापती यतिन पगार यांनी दिले.आरोग्य समितीची मासिक बैठक सभापती यतिन पगार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत आरोग्य विभागाचा आढावा घेण्यात आला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या उत्कृष्ट कामबद्दल या कामी चांगले कार्य केलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश वाघ, डॉ. संदीप वेढे व डॉ. देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. अतिसार नियंत्रण पंधरवडा साजरा करण्याबाबतच्या परिपत्रकाचे वाचन स्तनपान सप्ताहबाबत आरोग्य अधिकाºयांनी माहिती दिली. दूषित पाणी नमुन्यासंदर्भात ग्रामसेवकांना व अनुपस्थित नांदगावच्या अधिकाºयांना नोटीस बजावण्याचे आदेश पगार यांनी दिले. येवला तालुक्यातून बदली झालेल्या कर्मचारी त्यांना कार्यमुक्त करावे. कामावर हजर होईपर्यंत त्यांचे वेतन काढू नये, असे आदेश देण्यात आले. बैठकीस यशवंत गवळी, यशवंत ढिकले, हरिदास लोहकरे, सारिका नेहरे, डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.