नाशिकरोड : विभागीय अप्पर आयुक्तांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून खोटी नोटीस पाठविल्याचा प्रकार विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत अपिल शाखेत उघडकीस आल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास आस्थापना शाखेचे कक्ष अधिकारी शरद शिवदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विभागीय अप्पर आयुक्त यांच्यासमोर चालणारे ग्रामपंचायत अपिल संदर्भात संबंधित पक्षकारांना नोटीस काढण्याचे काम करतात. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सावखेडेसिम ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नशिबा नुरमोहम्मद तडवी यांच्याकडे सरपंच पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्या काळात त्यांनी ग्रामपंचायतीची मासिक सभा घेतली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य साकीर मुबारक तडवी व इतर दोन जणांनी जळगावच्या जिल्हाधिकाºयांकडे अर्ज करून उपसरपंच नशिबा तडवी यांना अपात्र ठरवावे अशी विनंती केली होती. जळगाव जिल्हाधिकाºयांकडे सदर अर्जाप्रकरणी सुनावणी होऊन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर फेटाळलेल्या अर्जाच्या अनुषंगाने विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केले असल्याचे भासवुन १५ सप्टेंबर २०१७ रोजी अप्पर आयुक्त यांच सही करून व कार्यालयाचा गोल शिक्का मारून १० आॅक्टोबर २०१७ रोजी सुनावणीसाठी हजर राहाण्याची नोटीस जळगाव जिल्ह्यातील टपाल कार्यालयामार्फत उपसरपंच नशिबा तडवी यांना पाठविली होती. तडवी या अप्पर आयुक्त कार्यालयात सुनावणीसाठी हजर झाल्या असता अप्पर आयुक्त कार्यालयात असे कुठलेही ग्राम पंचायतीचे अपील दाखल नसल्याचे व त्यासंदर्भात कुठलीही नोटीस पाठविली नसल्याचे उघडकीस आले. सावखेडेसीम ग्रामपंचायतीच्या अज्ञात सदस्य किंवा कुठल्यातरी ग्रामस्थाने सदरच्या नोटिसवर खोटा ग्रामपंचायत अपील क्रमांक व अप्पर आयुक्तांची खोटी सही करून शिक्का मारून फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
नाशिकच्या विभागीय अप्पर आयुक्तांची बनावट सही करुन पाठवली नोटिस; प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:28 PM
नाशिकरोड : विभागीय अप्पर आयुक्तांच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून खोटी नोटीस पाठविल्याचा प्रकार विभागीय अप्पर आयुक्त कार्यालयातील ग्रामपंचायत अपिल शाखेत उघडकीस आल्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास आस्थापना शाखेचे कक्ष अधिकारी शरद शिवदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विभागीय अप्पर ...
ठळक मुद्दे खोटा ग्रामपंचायत अपील क्रमांक व अप्पर आयुक्तांची खोटी सही करून शिक्का मारून फसवणूक केल्याचे उघडकीस