नाशिक - नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२) सकाळी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लेटलतिफ आणि गैरहजर राहणा-या सफाई कामगारांसह गोदाघाटावरील सुरक्षा रक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेश महापौरांनी आरोग्याधिका-यांना दिले.शहरात येत्या ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. नाशिक शहर हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असल्याने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात कामगिरी उंचावण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी पंचवटी भागात अचानक पाहणी दौरा करत स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. महापौरांनी गोदाघाटावरील रामकुंडावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोदावरी संवर्धन कक्षामार्फत गोदाघाटावर नेमण्यात आलेले बरेचसे सुरक्षारक्षक जागेवर दिसून आले नाहीत. त्यानंतर महापौरांनी सफाई कामगारांच्या हजेरी शेडलाही भेट देऊन पाहणी केली असता अनेक सफाई कामगार गैरहजर असल्याचे तर काही कामगार उशिराने कामावर हजर झाल्याचे दिसून आले. या गैरहजर आणि लेटलतिफ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले. महापौरांनी संजयनगर, फुलेनगर, इंदिरा गांधीनगर येथील हजेरीशेडला भेट दिली.बसस्थानकाची पाहणीमहापौरांनी पंचवटीतील निमाणी बसस्थानक, बाजार समिती यांच्या आवरांचीही पाहणी करत तेथील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजीमार्केट परिसरातही स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले.
नाशिक महापालिकेच्या लेटलतिफ सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षकांना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:24 PM
महापौरांचा अचानक पाहणी दौरा : व्यापारीपेठा, भाजीमार्केट परिसर स्वच्छतेचे आदेश
ठळक मुद्देशहरात येत्या ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहेमुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असल्याने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात कामगिरी उंचावण्याचे आव्हान