नाशिक : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना पालिकेने पाठविलेली नोटीस मिळाली किंवा नाही याचा संभ्रम असून, रजिस्टर एडीने पाठविलेल्या पत्राची पोच टपाल खात्याकडूनही न मिळाल्याने वैद्यकीय विभागाने या विभागाकडे धाव घेतली आहे. गेल्या १० जूनला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष भिडे यांनी आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलेच होतात असा दावा केला होता. यासंदर्भात आरोग्य सहसंचालकांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोटीस बजावली असून, आंबे खाल्ल्यास मुले होतात हे विधान केले होते काय, असा प्रश्न करतानाच आंबे खाल्ल्याने मुले झाली, त्यांची नावे पत्त्यासह यादी मागविण्यात आली आहे. सदरचे पत्र १८ जून रोजी पालिकेने रजिस्टर एडीने पाठविले होते; मात्र दहा दिवस उलटूनही संभाजी भिडे गुरुजींकडून उत्तर तर नाहीच परंतु त्यांना नोटीस मिळाल्याची पोच टपाल खात्याकडून अद्याप मिळाली नसल्याने अखेरीस महापालिकेने शुक्रवारी (दि. २९) टपाल खात्याकडे पत्र पाठवून विचारणा केली आहे.
भिडेंना नोटीस मिळाल्याची पालिकेला पोच मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:51 AM