नाशिक : शेती क्षेत्राचा वापर विनापरवाना बिगरशेती व्यवसायासाठी करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर परिसरातील शेतीक्षेत्रात हॉटेल्स आणि ढाबा, असे व्यवसाय थाटण्यात आले असल्याने अशा मिळकतधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावून करवसुलीला सुरुवात केली आहे. कोट्यवधींचा कर नोटिसानंतर वसूल करण्यात आला असून, काही मिळकतधारकांना अंतिम नोटिसा धाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जागेचा बिनशेती वापर करणाऱ्यांमध्ये खासगी आणि शासकीय व्यवस्थापकांचादेखील समावेश असून, अशा सर्वांना नोटिसा धाडण्याचे कामकाज अजूनही सुरूच आहे. कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढील महिन्यापासून मोहित अधिक व्यापक केली जाणार असल्याची माहिती नाशिक तहसीलदारांनी दिली. शेतजमिनीची बिनशेतीसाठी वापर करणाºया व्यावसायिकांकडून दरवर्षी मार्च महिन्यात बिनशेती कराची वसुली केली जाते. शेतीसाठी असलेल्या जागांचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्याचे यंदा अधिक आढळून आले आहे.शहरातील प्रमुख मार्गांवर अलीकडे मोठ्या प्रमाणात व्यवसायांचे प्रमाण वाढले आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये रहिवासी क्षेत्रातही वाणिज्यिक वापर वाढल्याची बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे. शहरातील अनेक भागांत रहिवासासाठी बिनशेती म्हणून रितसर महसूल विभागाची परवानगीदेखील घेतलेली आहे, परंतु आता त्याच जागेवर व्यावसायिक वापर सुरू झाला आहे. वास्तविक जमिनीच्या वापरात बदल करावयाचा झाल्यास महसूल विभागाचे परवानी घेणे अपेक्षित असते. परंतु अशी परवानगी न घेणाºया मिळकतधारकांना नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत.प्रसंगी बांधकामही पाडणारमहाराष्टÑ जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे बदल केलेल्या जमीन वापराच्या अनुषंगाने व वापरात बदल केल्याच्या दिनांकापासून नोटीस बजविण्याच्या तारखेपर्यंतची करवसुली संबंधितांकडून केली जाणार आहे. शेतीचा मूळ वापर टाळून व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी बांधकाम काढून टाकण्यासाठीच्या नोटिसा अनेकांना बजविण्यात आलेल्या आहेत.
बिनशेती वापर करणाऱ्या मिळकतधारकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:39 PM
शेती क्षेत्राचा वापर विनापरवाना बिगरशेती व्यवसायासाठी करण्याचा प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर परिसरातील शेतीक्षेत्रात हॉटेल्स आणि ढाबा, असे व्यवसाय थाटण्यात आले असल्याने अशा मिळकतधारकांना महसूल विभागाने नोटिसा बजावून करवसुलीला सुरुवात केली आहे. कोट्यवधींचा कर नोटिसानंतर वसूल करण्यात आला असून, काही मिळकतधारकांना अंतिम नोटिसा धाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देकोट्यवधींच्या वसुलीचे उद्दिष्ट शहर, ग्रामीण भागात रहिवासी क्षेत्राचा व्यावसायिक वापर