नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मिळकत सर्वेक्षणात मोजणी करणाºया पथकाला प्रवेश नाकारणाºया मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यात प्रामुख्याने अनेक सरकारी कार्यालयांसह शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स यांचा समावेश आहे. दरम्यान, सुमारे ८० हजार मिळकतींचे प्रवेश नाकारल्याने अथवा कुलूपबंद असल्याने सर्वेक्षण होऊ शकलेले नाही. त्यांचे पुनर्सर्व्हेक्षण केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्यासाठी नवी दिल्ली येथील जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या कंपनीला काम देण्यात आले आहे. सध्या महापालिकेच्या दप्तरी चार लाख दहा हजार मिळकतींची नोंद आहे. जिआॅग्राफिकल सर्व्हेच्या माध्यमातून त्यात १५ ते २० टक्के मिळकतींची संख्या वाढण्याची अपेक्षा महापालिकेला आहे. सर्व्हेमध्ये प्रामुख्याने वाढीव बांधकामे, अनधिकृत बांधकामे, वापरात बदल, भाडेकरू, टॅक्सनेटमध्ये नसलेल्या मिळकती यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत तीन लाख ६० हजार मिळकतींचा सर्व्हे पूर्ण झाला असून, त्यात तब्बल ५६ हजार मिळकती या नव्याने आढळून आल्या आहेत. अजून सुमारे ७० ते ८० हजारांच्या आसपास मिळकतींचे सर्वेक्षण होणे बाकी आहे. दरम्यान, मिळकत सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकांना सोबत ओळखपत्र असूनही अनेक ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने, शहरातील काही शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स तसेच अनेक सरकारी कार्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेने आता प्रवेश नाकारणाºया मिळकतधारकांची यादी तयार करत त्यांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. सर्वेक्षणात काही मिळकती या कायमस्वरूपी बंद असल्याचे तर काही नोकरी-व्यवसायनिमित्त बाहेर असल्याने कुलूपबंद मिळकती आढळून आल्या. अशा मिळकतींनाही नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
प्रवेश नाकारणाºयांना बजावणार नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:25 AM