लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : शहराचे द्विभाजन करणारे व औरंगाबाद-येवला रस्त्यावरील भरगच्च रहदारीच्या मार्गावरचे फाटक क्र. ११४ बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलली असून, त्यासाठी प्रस्तावित सब-वेच्या कामासाठी रेल्वे रुळाच्या तीस मीटर अंतरात येणारी अतिक्रमणे काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना पंधरा दिवसांच्या आत दुकाने खाली करण्याच्या नोटिसा बजाविल्याने गदारोळ उडाला आहे.दररोज काही हजार दुचाकी तसेच छोटी व मध्यम वाहने या फाटकातून ये-जा करीत असतात. आधी मनुष्यबळाने चालन करण्यात येत असलेल्या या फाटकात वाहनांची गर्दी वाढल्याने रहदारी कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्याचे स्वयंचलित फाटकातरूपांतर करण्यात आले. तरीही दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रहदारी कोंडीच्या समस्यांमध्ये भर पडली. दुसरीकडे रेल्वेगाड्यांची संख्या वाढली. त्यामुळे फाटकाचा रेल्वेच्या गतीला अवरोध होऊ लागला. या समस्येवर उपाय ठरेल अशा पर्यायी व्यवस्थेचे काम सध्या युद्धपातळीवर जोरात सुरू करण्यात आले आहे.सबवेसाठी खोदण्यात येणाऱ्या भुयारी मार्गात अडथळा ठरणारी दुकाने हटविण्यासाठी रेल्वेने पाऊले उचलली आहेत. संबंधितांना पंधरा दिवसांच्या आत दुकाने खाली करून देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. रेल्वे लोहमार्गाच्या उजवीकडे सब-वेच्या कामासाठी खोदकाम सुरू केले जाणार असल्याने तीस मीटरच्यापरिघातले अडथळे दूर करण्यासाठी सुरू करण्यात येणाºया कामामुळे, होणारे मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी संबंधितांनी आपले सामान काढून घ्यावे, अशी नोटीस रेल्वेच्या वतीने बजाविण्यात आली आहे.गेली अनेक दशके सदर जागा ज्यांच्या रोजीरोटीचे साधन बनली होती, त्यांचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोहमार्गाखालून सहा मीटर खोलीचा व तीन मीटर उंचीचा हा सब-वे असणारआहे.अधिकृत मालमत्ता- धारकांचा पुनर्वसनासाठी न्यायालयीन लढा हाच सध्या एकमेव पर्याय आहे.- भास्कर कदम,माजी नगराध्यक्ष, नांदगाव