नाशिक : नाशिकरोड येथील शासकीय निवासस्थानांमध्ये बेकायदेशीररीत्या कब्जा करणाºया निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांवर बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, संबंधितांना घरे खाली करण्याबाबतच्या नोटिसा बजाविल्या आहेत.नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तालयाकडे जाणाºया मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शासकीय निवासस्थाने आहेत. सदर निवासस्थानांमध्ये शासकीय सेवेतील कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते. मात्र सेवानिवृत्त होऊनही अनेक वर्षांपासून काही अधिकारी कर्मचाºयांनी बेकायदेशीररीत्या निवासस्थाने बळकाविली असून, सदर निवासस्थाने खाली करण्यासाठी कारवाई सुरु झाली आहे.शासकीय निवासस्थाने असलेल्या जागेवर विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी उभारण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. मात्र याठिकाणी अजूनही सदनिका असून त्यामध्ये अनेकांनी बळजबरीने कब्जा केलेला आहे. वास्तविक सेवानिवृत्तीनंतर सरकारी निवासस्थाने रिकामी करणे आवश्यक असताना अनेकांनी ताबा ठेवला आहे.विभागीय प्रशिक्षण प्रबोधिनीसाठी नियोजित सरकारी जागेत बेकायदेशीर राहणाºयांवर कारवाई करून निवासस्थाने रिकामी करण्यात येत आहेत. या कारवाईत अडथळा आणणाºयांवर बांधकाम विभागामार्फत कारवाई केली जाईल.- अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी
शासकीय निवासस्थाने बळकविणाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 1:41 AM