आहार अभ्यासकांचे मत : प्रत्येक जिवाला मिळावे चांगले भोजन
मुकुंद बाविस्कर।नाशिक : ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणतात ते अगदी सार्थ आहे. प्रत्येक मनुष्यप्राण्याला जीवन जगण्यासाठी तीन मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न होय. शरीरातील मूलभूत घटक म्हणजे पेशी. या पेशी जिवंत राहण्यासाठी पोषण लागते. ग्लुकोज, अमिनो, आम्ले, मेदाम्ले, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडीन, जीवनसत्त्व असे घटक लागतात. हे सर्व घटक आपण अन्नातूनच मिळवतो. म्हणून अन्नाचा व आरोग्याचा खरे तर जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे, त्यासाठी प्रत्येकालाच योग्य भोजन मिळायला हवे, असे मत आहारतज्ज्ञ त्याचप्रमाणे सामाजिक अभ्यासक व्यक्त करतात.१६ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृ षी संघटनेची स्थापना करण्यात आली. हा दिवस दरवर्षी ‘जागतिक अन्न दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. जगात आजही सुमारे ८० कोटी लोकांना उपाशी रहावे लागते. ही संख्या येत्या दहा वर्षांत निम्म्यावर आणायचा निर्धार बहुसंख्य राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या सहस्त्रकोत्तर विकास ध्येयांमध्ये याचा समावेश आहे. पर्यावरणाचा ºहास न करता जगभरातील लोकांना पुरेसे अन्न उपलब्ध करण्याचे आव्हान जगातील सर्व प्रगत राष्ट्रांपुढे आहे. अनेक शतकांपासून आरोग्य व रोग यांचा अन्नाशी संबंध आहे, हे मानवाला ज्ञात आहे. खरे तर माणसाचा सर्व इतिहास म्हणजे अन्न मिळविण्यासाठी त्याने केलेल्या संघर्षाचा इतिहास मानला जातो. आदिमानव सुरुवातीला प्राण्यांची शिकार करून त्यांचे कच्चे मांस खायचा. त्यानंतर तो शेती करायला लागला. प्राणी पाळायला लागला. त्यामुळे अन्नात विविध वस्तू समाविष्ट झाल्या. अन्न शिजवणे, टिकवणे तसेच त्यावर प्रक्रिया करण्याच्या अनेक पद्धतींचा शोध लागत गेला. आधुनिक काळात मानवाचा आहार वैविध्यपूर्ण झाला असून, पोषणाचे शास्त्रसुद्धा विकसित झाले आहे.आपल्या देशात पोषणाशी संबंधित अनेक आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. मातेच्या कुपोषणामुळे कुपोषित बालके जन्माला येतात. तर दुसरीकडे फास्टफूडची क्रेझ वाढल्याने खात्यापित्या घरातील मुले लठ्ठ होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यातून अनेक आजार निर्माण होत असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. काय खावे, काय खाऊ नयेआरोग्य व आहार तज्ज्ञांच्या मतानुसार प्रत्येक व्यक्तीने आरोग्यपूर्ण जगण्यासाठी समतोल व चौरस आहार घ्यावा.दैनंदिन आहारात २५ टक्के मेद पदार्थ घ्यावेत.कर्बोदकांचा वापर वाढवावा.दररोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.दैनंदिन आहारात २० टक्के प्रथिने असावीत.शीतपेये, केचअप, तेलकट, तूपकट पदार्थ टाळावेत.जीवनसत्त्वयुक्त पालेभाज्या व फळे खावेत.बेकरीचे पदार्थ व फास्टफूड टाळावेत.