नाशिक- शहरात कोणतीही इमारत बांधल्यानंतर संबंधीत विकासकाला तत्काळ घरपट्टी लागु करण्यात येणार असून त्यानंतर सदनिका विकल्यानंतर नवीन मिळकतधारकांकडून वसुली करण्यात येणार आहे.
शहरात एखादी इमारत किंवा व्यापारी संकुल बांधल्यानंतर त्याची विक्री केली जाते आणि त्यानंतर नवीन सदनिकाधारक किंवा गाळेधारक घरपट्टी भरतात. परंतु त्याला मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. कारण, इमारत बांधल्यानंतर लागु होणारी घरपट्टी विकासक भरत नाही.त्यामुळे ज्यावेळी त्या इमारतीतील सदनिकेची किंवा गाळ्याची विक्री होईल, त्यानंतर त्या सदनिकाधारकास किंवा गाळे धारकास इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यापासून त्याची विक्री होईपर्यंत थकलेली सर्व घरपट्टी भरावी लागते. मात्र, आता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नविन आदेश दिले असून त्यानुसार इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन पूर्णत्वाचा दाखला मिळाल की तत्काळ विकासकाला घरपट्टी भरावी लागणार आहे.