शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

साधुग्रामनंतर आता ‘भाविकग्राम’निवाऱ्याची सोय

By admin | Published: January 30, 2015 12:27 AM

४३ ठिकाणांची निश्चिती; कावनई, त्र्यंबकला निवाराशेड

  नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधु-महंतांसाठी तपोवनातील सुमारे पावणे तीनशे एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली जात असतानाच, या कुंभमेळ्यात पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी कोट्यवधीच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवाऱ्याचीही समस्या प्रशासनासमोर उभी ठाकली असून, त्यावर पर्याय म्हणून साधुग्राम प्रमाणेच ‘भाविकग्राम’ची निर्मितीचा विचार पुढे आला आहे. ऐन पावसाळ्यातच सिंहस्थाच्या शाही पर्वण्या असल्यामुळे गोदावरीत पवित्र स्नानासाठी कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थ साप्ताहिक आढावा बैठकीत यावर चर्चा होऊन ज्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येईल त्याच ठिकाणी भाविकग्रामची सोय करण्यावर एकमत झाले. त्यातही इगतपुरीच्या कावनई येथे दोन, त्र्यंबकेश्वर येथे आठ व नाशिक शहरालगतच्या पंधरा ठिकाणांवर ३३ ठिकाणी अशा ४३ ठिकाणांवर वाहनतळाशेजारीच निवाराशेड उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर अंतर्गत व बाह्य वाहनतळाची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी जवळपास आठशे एकर जागेची निकड आहे. अशा वाहनतळांवर प्रत्येक व्यक्तीस साधारणत: लागणाऱ्या जागेचा विचार करता, एकेका ‘भाविकग्राम’मध्ये तीनशे ते साडेतीनशे भाविकांची सोय होऊ शकते. त्यानुसार सुमारे दोन लाख भाविक सामावून घेण्याची क्षमता असलेले भाविकग्राम उभारण्याबाबत एस.टी. महामंडळ, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाला अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्वणीच्या काळातच विशिष्ट मुदतीसाठी पाण्यापावसापासून बचाव करणारे व भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणारे भाविकग्राम उभारण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील भाविकग्राम मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. (प्रतिनिधी)