शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जनावरांसाठीही आता आधार नोंदणी आॅनलाइन : कानातल्या बिल्ल्याने जनावरांची तयार होणार ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:13 AM

माणसांप्रमाणे जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने दुभत्या जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले बिल्ले टोचून त्यांना ओळख देण्याचे महत्त्वकांक्षी पाऊल उचलले आहे. दुभत्या जनावरांच्या कानात बिल्ले टोचून त्याची आॅनलाइन नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

सिन्नर : माणसांप्रमाणे जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने दुभत्या जनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले बिल्ले टोचून त्यांना ओळख देण्याचे महत्त्वकांक्षी पाऊल उचलले आहे. दुभत्या जनावरांच्या कानात बिल्ले टोचून त्याची आॅनलाइन नोंदणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.केंद्र शासनाने ‘इनाफ’ (आयएनएपीएफ) योजनेंतर्गत देशातील सर्व दुधाळ गायी व म्हशींना आधार नंबर देऊन तो नंबर त्यांच्या मालकाच्या आधार नंबर सोबत जोडण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत जनावरांच्या कानात प्लॅस्टिकचा बिल्ला व त्यावर बारा अंकी नंबर असणार आहे. शक्यतो जनावरांच्या डाव्या कानात सदर बिल्ला टोचला जाणार आहे. सदर क्रमांक अन्य दुसºया जनावरांना येणार नाही. त्यामुळे या क्रमांकाने जनावरांना स्वत:ची ओळख निर्माण होणार आहे. जनावरांची आॅनलाइन नोंदणी झाल्यावर त्या जनावराच्या त्या जनावराच्या सर्व नोंदी आॅनलाईन होणार आहे. सर्व दुधाळ जनावरांची नोंदणी आॅनलाइन झाल्यानंतर शासनाच्या सर्व योजना जनावरांच्या आधार नंबर वर अवलंबून असतील अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखन्यात जनावरांना आणून त्यांच्या कानात बारावर बारा अंकी आधार नंबर टोचून मिळणार आहे. शक्यतो अगोदर दुधाळ व प्रजननक्षम जनावरांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनावरांची नोंदणी होईल. जनावरांच्या आॅनलाइन नोंदणीत मालकाचे नाव, मोबाइल नंबर व आधार नंबर असणार आहे. पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी दैनंदिन काम सांभाळून सदर योजना राबविणार आहेत. जिल्ह्णातील पहिली नोंदणी सिन्नरलाजनावरांच्या कानात बारा अंकी क्रमांक असलेले व स्वत:ची ओळख निर्माण करुन देण्याच्या या उपक्रमाचा सिन्नर तालुक्यातून शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्णातील पहिली जनावरांची ओळख निर्माण करणारी आधार नोंदणी सिन्नर तालुक्यात झाली. आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, गटविकास अधिकारी भारत धिवरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांच्या उपस्थितीत जनावरांच्या कानात प्लास्टिकचा बारा अंकी क्रमांक असलेला बिल्ला टोचून या उपक्रमास प्रारंभ झाला.