शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

...आता काळविटांना मिळणार पौष्टिक चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:31 AM

नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक, मालेगाव, अहमदनगर, संगमनेर, जळगाव या भागातील कुरण वनक्षेत्र विकासाच्या ...

नाशिक वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक, मालेगाव, अहमदनगर, संगमनेर, जळगाव या भागातील कुरण वनक्षेत्र विकासाच्या दृष्टीने तेथील सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षकांची विभागीय कार्यशाळा ममदापूर-राजापूरमध्ये गुरुवारी घेण्यात आली. या कार्यशाळेत सेवानिवृत्त वनसंरक्षक तथा कुरण अभ्यासक सुभाष बडवे यांनी उपस्थितांना गवताची लागवड पद्धती, प्रजातींचा विकास, बिया संकलन, गवताचे महत्त्व समजावून दिले. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, श्वेता रेड्डी, सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे, वनक्षेत्रपाल संजय भंडारी, संजय पवार यांसह वनधिकारी व वनरक्षक उपस्थित होते.

जैवविविधतेच्या समृद्धतेसाठी गवताळ प्रदेश, माळरानांची भूमिका महत्त्वाची ठरते. यामुळे राज्यातील सर्वच वनवृत्तांमधील गवत कुरण विकसित करण्याचा प्रस्ताव सरकारने वनविभागापुढे ठेवला आहे. यादृष्टीने नाशिक वनवृत्ताकडून पहिली एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. काळवीट, साळींदर, रानडुक्कर यांसारख्या तृणभक्षी वन्यजीवांना तसेच पक्ष्यांच्या विविध प्रजातींना किड्यांचे खाद्य उपलब्ध होणार आहे. अन्नसाखळी सक्षम करण्यासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे.

--इन्फो--

या प्रजातींचा विकास

ममदापूर संवर्धन वनक्षेत्रात शेडा, मोठा पवण्या, लहान पवण्या, दिनाना, छोटा पवण्या, डोंगरी यांसारख्या गवताच्या प्रजातींचा पहिल्या टप्प्यात विकास केला जाणार आहे. सध्या असलेल्या गावतामध्ये वरील प्रजातींचे गवत कमी-अधिक प्रमाणात दिसून येते. बियांपासून रोपे तयार करून त्याची लागवड केली जाणार आहे. यामुळे काळविटांना वैविध्यपूर्ण पद्धतीचा चारा खाण्यास वाव मिळेल, असा वनविभागाचा दावा आहे.

---कोट--

गवत कुरण चांगल्याप्रकारे विकसित झाल्यास जमिनीची धूप थांबते. ममदापूर, चांदवड वनक्षेत्रातील माळरानावर गवताच्या स्थानिक विविध प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे. लागवडीनंतर चार ते पाच महिन्यांमध्ये कुरण विकास दिसेल. पूर्व वनविभाागच्या विविध वनपरिक्षेत्रांकडून बियांचे संकलनही करण्यात आले आहे. काळविटांची संख्या आणि सुदृढता वाढीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, पूर्व वनविभाग

------

फोटो आर वर १२फॉरेस्ट/ १२फॉरेस्ट१ नावाने सेव्ह आहे.--इन्फो--