शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

नाशकात आता आॅटो ‘आॅनलाइन’

By admin | Published: September 27, 2015 12:07 AM

टॅक्सी कंपन्यांशी स्पर्धा : स्पर्धात्मक दरामुळे नागरिकांचा फायदा

नाशिक : प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅपद्वारे आॅनलाइन टॅक्सी मागविण्यासाठी नोंदणी करण्याच्या व्यवसायापाठोपाठ आता ‘आॅनलाइन आॅटोरिक्षा’ सुरू होणार आहे. एका खासगी कंपनीने त्यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या १ आॅक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कमी दर आकारण्यासाठी स्पर्धा सुरू असून, टॅक्सी सेवेपेक्षा कंपनी कमी दर आकारणार असल्याचे सांगण्यात आल्याने ग्राहकांना मात्र फायदाच होणार आहे.नाशिक शहरात खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केवळ आॅटोरिक्षाच होत्या. त्यानंतर गेल्यावर्षीपासून ‘ओला’ आणि ‘टॅक्सी फॉर शुअर’ या दोन कंपन्यानी शहरांतर्गत टॅक्सी सेवा सुरू केली. पाठोपाठ उबेरही ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली. शहरात टॅक्सीसेवेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. रिक्षात कोंबून बसून प्रवास करण्यापेक्षा टॅक्सीचा प्रवास सुखकर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अर्थात, यानंतरही रिक्षाच्या प्रवासी संख्येत फार घट झालेली नाही. परंतु आता आॅटोरिक्षांची आॅनलाइन सेवा सुरू होत आहे. जुगनू या कंपनीची ही सेवा असून, ही कंपनी मात्र स्थानिक रिक्षाचालकांना सहभागी करून घेणार आहे. कंपनीची स्वत:ची एकही रिक्षा नाही, स्थानिक पाचशे रिक्षाचालकांच्या मदतीने सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मनप्रितसिंग यांनी सांगितले. कंपनीची स्पर्धा ही रिक्षाचालकांशी नाही फार ती टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांशी असेल, असेही ते म्हणाले. नाशिकमध्ये खासगी प्रवासी टॅक्सींनी स्पर्धात्मक दर ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर आॅटोचे दरही स्पर्धात्मक असतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)