नाशिक महापालिकेच्या वतीने सुमारे ३२ सेवा केंद्रे असून, येस बँकेच्या मदतीने सुरू असलेल्या या केंद्रामार्फत दाखल्यांसाठी अर्ज स्वीकृत करून त्याच ठिकाणी दाखला देण्याची देखील तरतूद आहे. बाळाचे नाव नसलेला अर्ज कुटुंबातील सदस्य सहज घेऊ शकत असला तरी अनेकदा मुलांचे नाव ठेवण्यावरून कौटुंबिक वाद होतात. अशा वेळी महापालिकेतील नोंदींना न्यायालयात आव्हान देण्याचे प्रकार देखील घडतात. त्या पार्श्वभूमीवर आता बालकाचे नाव महापालिकेच्या जन्मदाखल्यावर नेांदणीसाठी आई किंवा वडिलांचीच गरज असते आणि त्यांचे आधारकार्ड देखील घेतले जाते. त्यांनी आधारकार्ड दिले तरी ते अचूक असावे किंवा त्यातून फसवणूक होऊ नये यासाठी वैद्यकीय विभागाने बायोमेट्रिक किंवा थंबिंग मशीनच्या माध्यमातून त्या पालकाची माहिती संकलित करण्याचे ठरवले असून, तसे झाल्यास संबंधित पालकाच्या आधारकार्डाची माहिती तत्काळ मदत केंद्राला स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे ती अधिकृतरीत्या पक्की माहिती होईल. शहरातील सर्व माहिती केंद्रांवर ही सुविधा दिली जाणार आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांनी यासंदर्भात आयुक्तांना प्रस्ताव सादर केला आहे. जन्मदाखल्याप्रमाणेच मृत्यूच्या दाखल्यासाठी सुद्धा अर्जदाराचे आधारकार्ड घेऊन त्याची पडताळणी करण्यासाठी देखील याच पद्धतीने माहिती घेण्याचे नियोजन सुरू आहे, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.
कोट...
जन्मदाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांची माहिती आधारकार्डावर असली तरी थंब इंप्रेशन घेऊन संबंधित व्यक्तीची माहिती सहज शासनाच्या पोर्टलद्वारे उपलब्ध होऊ शकते. शासनाकडून अशाप्रकारची माहिती निमशासकीय संस्था म्हणून सहज उपलब्ध होऊ शकते.
- डॉ. प्रशांत शेटे, वैद्यकीय अधिकारी मनपा