पेठ : शैक्षणकि गटसंमेलन म्हणजे शाळा व शिक्षकांच्या बौध्दीक देवाणघेवाणीचे एकू हक्काचे व्यासपीठ . शैक्षणकि चर्चा, उपक्र म, आदर्श पाठ आदी विषयांमुळे शिक्षकांना मार्गदर्शन मिळणारा एक मेळा. मात्र गत चार वर्षापासून निधीअभावी बंद पडलेला हा उपक्र म प्रगत शैक्षणकि महाराष्ट्रात नव्या स्वरूपात शासनाने कार्यान्वयीत केला असून यापुढे दरमहा केंद्रस्तरावर शिक्षण परिषद घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी काढलेल्या एका परिपत्रकाद्वार या नव्या उपक्र माची माहिती दिली असून प्रगत शैक्षणकि महाराष्ट्रात 100 टक्के शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने राज्य ते तालुका पातळीवर होणार्या शैक्षणकि परिषदा यशस्वी होत आहेत. शिक्षक व अधिकारी, पालक यांना प्रोत्साहित करण्यासाठी लोकसहभाग, आयएसओ मानांकन, डिजीटल शाळा, ज्ञानरचनावाद, संगणक शाळा, नवीन शिक्षण पध्दती आदींचे मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने केंद्रस्तरावर शिक्षण परिषद आयोजित करण्यात येणार आहे. दरमहा केंदातील वेगवेगळ्या शाळांवर होणार्या या परिषदेत विविध शैक्षणकि चर्चा, परिसंवाद, व्याख्याने, यशोगाथा, शैक्षणकि साहित्यनिर्मिती यांच्यासह शासकिय अधिकारी व शिक्षणतज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.या निर्णयामुळे पून्हा एकदा शिक्षकांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असून शैक्षणकि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ह्या केंद्रसरीय शिक्षण परिषद मैलाचा दगड ठरणार हे नक्की.
आता केंद्रशाळेत शिक्षण परिषद
By admin | Published: September 02, 2016 10:19 PM