बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्वच कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात नोंदीत व अनोंदीत असा भेदभाव राहणार नसून, सुमारे २५ ते ४० हजार कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील रेनॉल्ट सर्व्हिस स्टेशनसमोर गुरुवारी दुपारी ४ वाजता केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन इमारत व इतर बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.सी.श्रीरंगम, कामगार उपायुक्त विकास माळी, सहायक कामगार आयुक्त शर्वरी पोटे व एस. टी.शिर्के यांनी केले आहे.
कोट..
मध्यान्ह योजना राबविण्यासाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करून स्वयंपाक तयार केला जाणार आहे. एकदा तयार झालेले अन्न सुमारे चार तास गरम राहील. २५ पेक्षा जास्त मजूर काम करीत असलेल्या ठिकाणांवर जाऊन त्यांना मध्यान्ह भोजन दिले जाणार आहे.
- विकास माळी कामगार उपायुक्त, नाशिक.