शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

आता कोरोनाबाधिताची इमारत फक्त सील होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 9:32 PM

नाशिक : एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळला की, यापूर्वी पाचशे मीटर क्षेत्र सील केले जात असे. परंतु आता मात्र नव्या नियमानुसार बाधित रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची इमारत अथवा जास्तीत जास्त त्यांची संपर्क साधने शोधून तेवढाच भाग सील करण्यात येणार असल्याने आता अन्य नागरिकांना क्वॉरंटाइन व्हावे लागणार नाही.

नाशिक : एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळला की, यापूर्वी पाचशे मीटर क्षेत्र सील केले जात असे. परंतु आता मात्र नव्या नियमानुसार बाधित रुग्ण राहात असलेल्या सदनिकेची इमारत अथवा जास्तीत जास्त त्यांची संपर्क साधने शोधून तेवढाच भाग सील करण्यात येणार असल्याने आता अन्य नागरिकांना क्वॉरंटाइन व्हावे लागणार नाही.शहरात सर्व प्रथम गोविंदनगर भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बाधिताच्या घरापासून तीन किलोमीटर क्षेत्रातील सर्व परिसर सील केला होता. चौदा दिवस हा भाग प्रतिबंधित केल्यानंतर परिसरातील नागरिकांना बाहेर येण्यास आणि बाहेरील नागरिकांना आत जाण्यास मनाई करण्यात आली होती.त्याचप्रमाणे भाजीपाला आणि दूध या सेवादेखील बफर्स झोनमध्येच देण्यात आल्या होत्या. दरम्यान, त्यानंतर मात्र महापालिकेने अन्य बाधितांच्या पाचशे मीटर परिसरात निर्बंध घालण्याचे धोरण अवलंबले. तर काही ठिकाणी संबंधित बाधित मालेगाव किंवा अन्यत्र कर्तव्यावर असल्याने तो पंधरा दिवस घरीच नव्हता किंवा केवळ रात्री घरी झोपण्यासाठीच येत असलेल्या बाधिताच्या घराजवळील जेमतेम शंभर मीटर परिसरच सील करण्याचे धोरण अवलंबले होते.कोरोनाबाधितचा सोसायटीत फार कोणाशी संपर्क नसेल तर किंवा तो बाहेरही पडला नसेल तरी चौदा दिवसांपर्यंत शंभर ते पाचशे मीटर भागातील नागरिकांना अकारण घरात अडकून पडावे लागत होते. त्यामुळे एका रुग्णामुळे परिसरातील नागरिकांनाही नसता मनस्ताप सहन करावा लागत होता. चौदा दिवसांत त्या भागात बाधित रुग्ण न आढळल्यास आयुक्त हा भाग प्रतिबंधित क्षेत्र नसल्याचे घोषित करतात.आता शासनाच्या सुधारित निर्णयाने अशा सर्वच नागरिकांची सुटका केली आहे. बाधित रुग्णाच्या दैनंदिन संपर्काचा अंदाज घेऊन त्याचे घर असलेली इमारत किंवा अगदी पन्नास मीटरपर्यंतच परिसर सील करता येऊ शकेल, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी सांगितले. त्यामुळे बाधिताच्या घराच्या परिसरातील नागरिकांना अकारण अडकून पडावे लागणार नसून, त्यांची यातून सुटका करण्यात आली आहे.------------------------------शहरात २३ प्रतिबंधित क्षेत्रे४नाशिक शहरात अनेक भागात कोरोनाबाधिताच्या परिसरात चौदा दिवस अन्य बाधित न आढळल्याने असे क्षेत्र प्रतिबंधित न ठेवता मुक्त करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १३ प्रतिबंधित क्षेत्रे रद्द करण्यात आली आहेत. तर २३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे कायम आहेत. सोमवारपर्यंत (दि.१९) २२ क्षेत्रे होती. मंगळवारी (दि. २०) थत्तेनगर भागात बाधित आढळल्याने तेथील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक