रामदास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : शालेय विद्यार्थी असोत किंवा सुशिक्षित सर्वांनाच गणित विषय तसा नावडताच. शाळेत गणिताचा तास आणि परीक्षेत गणिताचा पेपर म्हणजे विद्यार्थ्यांना संकटच. मात्र यावर आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, नाशिकच्या जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या (डीआयईसीपीडी) दोन विषयशिक्षकांनी फक्त गणितावर आधारित वेबसाइट विकसित केली असून, यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांना गणिताचे अवघड संबोध आता सोपे होणार आहेत.नाशिक जिल्ह्यात गणित विषयातील विविध संबोध, संकल्पना, उपक्रम, कृती तसेच जिल्ह्यातील गणित विषयातील होत असणारे कार्यक्रम, कार्यशाळा याबाबतीतील माहिती सर्वशिक्षकांना सहज उपलब्ध व्हावी, याकरिता वाल्मीक चव्हाण व वैभव शिंदे या दोन विषय सहायकांनी ६६६.ँल्ल्र३े्र३१ं.ूङ्म.्रल्ल (गणित मित्र) नावाची वेबसाइट विकसित केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील गणित मित्र शिक्षकांना जोडून गणित विषयाबाबत जिल्ह्यातील प्रत्येक मुलांपर्यंत संबोध, संकल्पना परिणामकारकरीत्या पोहचिवण्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. यासंबंधी नाशिक जिल्हा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकाससंस्था गणित विभाग यांचेमार्फत सदरची वेबसाईट गणित विषय सहायक वाल्मीक चव्हाण व वैभव शिंदे यांनी तयार केली असून त्या वेबसाइटवर गणिताच्या विविध कार्यशाळा, विविध प्रशिक्षणे, विविध संबोध, गणितासंबंधी लेख वाचण्यास मिळतील.पाच हजार शिक्षकांनी दिली भेटनाशिक जिल्ह्यातील गणित विषयाचे शिक्षक एकत्र येऊन गणितातील विद्यार्थ्यांचे संपादणूक वाढविण्यासाठी एकमेकांना मदत करतील, अशा प्रकारची ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. शिक्षण विभागामार्फत प्रत्येक महिन्याला केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येत असते. त्यामध्येही या वेबसाइटच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पाच हजार शिक्षकांनी या वेबसाइटला भेट दिली आहे.
आता गणिताचे कठीण संबोध होणार सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 1:37 AM
शालेय विद्यार्थी असोत किंवा सुशिक्षित सर्वांनाच गणित विषय तसा नावडताच. शाळेत गणिताचा तास आणि परीक्षेत गणिताचा पेपर म्हणजे विद्यार्थ्यांना संकटच. मात्र यावर आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असून, नाशिकच्या जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या (डीआयईसीपीडी) दोन विषयशिक्षकांनी फक्त गणितावर आधारित वेबसाइट विकसित केली असून, यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांना गणिताचे अवघड संबोध आता सोपे होणार आहेत.
ठळक मुद्देवेबसाइट लाँच । प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या विषयशिक्षकांचे योगदान