नाशिक : शहराच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता उद्रेक आता थेट नाशिक शहराजवळच असलेल्य भगूरगावातसुध्दा जाऊन पोहचला आहे. यामुळे भगुरवासीयांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. भगूर गावातील एक महिला व पुरूष प्रथमच कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य प्रशासनाने आपला मोर्चा आता भगूरकडे वळविला आहे.भगूर गावातील गणपती मंदिराजवळील ६० वर्षीय महिला आणि राममंदिररोड तेलीगल्ली येथील ५2 वर्षीय पुरु ष असे दोन प्रथमच करु ना बांधीत निघाल्याने नागरिक दक्षता बाळगत सतर्क झाले आहे. भगुर पालिका मुख्यधिकारी प्रतिभा पाटील आरोग्यसेवक एस.एन.शेख, रमेश राठोड. सफाई प्रमुख परशुराम कुटे आदिंनी कोरोनाबाधित महिलेच्या घराची पाहणी करु न परीसरातील ५००मीटरचा परिसर ‘सील’ केला आहे. घरातील सदर महिलेचे जवळचे सेवेकरीसह चार व्यक्तीना देवळाली छावणी परीषदेच्या दवाखान्यात विलगीकरण करण्यात आले आहे. भगुरमध्ये आज प्रथमच दोन कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे शासकीय लॉकडाऊन नियमांची आता भगूर गावातसुध्दा काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.दरम्यान, महिलेच्या विंचुरीदळवी येथील शेतावर नुकताच लग समारंभ झाला होता आणि त्याचवेळी मुंबई, पनवेल येथील नागरिक या महिलेच्या संपर्कात आल्यानंतर महिलासुध्दा कोरोनाबाधित झाल्याची चर्चा आहे. दुसरा कोरोनाबाधित पुरु ष मुंबई येथे नोकरीला असल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाली असावी, असे बोलले जात आहे.
...आता भगूर गावातसुध्दा कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 5:51 PM