दरम्यान, खासगी कार्पोरेट कंपन्यांप्रमाणेच देयकाचे स्मरण करण्यासाठी करदात्यांना त्यांच्या नाेंदणीकृत मोबाईलवर बल्क एसएमएसचा वापर करण्यात येणार आहे.
नाशिक महापालिकेने गेल्या वर्षी १४१ कोटी रुपयांंची विक्रमी घरपट्टी वसूल केली हेाती. मात्र, चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे गणितच बिघडले. महापालिकेने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते मे दरम्यान दिली जाणारी सवलतीची मुदत जून जुलैपर्यंत वाढवली. त्यानंतरही अपेक्षित वसुली होत नसल्याचे दिसल्यानंतर अभय योजना देखील राबवली आहे. तथापि, खूप भरीव वसुली होऊ शकलेली नाही. महापालिकेने घरपट्टी वसुलीसाठी सुधारीत उद्दिष्ट १३० कोटी रुपये ठरवले असले तरी अद्याप ९४ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. महापालिकेच्या अभय योजनेतही २२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. परंतु पुण्याला घरबसल्या वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून महापालिकेला घरपट्टी सहज सोपे असल्याने त्या दृष्टीने अपेक्षित प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाशिकमध्ये देखील पेटीएम, भीम ॲप किंवा कोणत्याही ॲपवरून घरपट्टी भरण्याची सोय देण्यात येणार आहे. त्यमुळे घरपट्टीत वाढ होईल अशी अपेक्षा आहे.
इन्फो..
१ मार्चपासून थकबाकीदारांवर कारवाई
दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात महापालिकेकडून थकबाकीदारांच्या विरोधात धडक कारवाई केली जाते. मात्र, कोरोनामुळे प्रशासन सक्ती करीत नाही तसेच सध्या अभय योजना सुरू असल्याने प्रशासनाने अन्य कारवाई सुरू केलेली नाही. अभय योजनेचा शेवटचा टप्पा २८ फेब्रुवारीस संपणार असून त्यानंतर १ मार्चपासून शहरात थकबाकीदारांच्या विरोधात धडक कारवाई करून प्रसंगी मालमत्ता जप्त करण्यात येईल अशी माहिती कर व कर संलकन विभागाचे उपआयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.