शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तक्रार निवारणासाठी मनपाचे आता नवे अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:43 AM

स्मार्ट सिटीमुळे डिजिटल यंत्रणेचा वापर करणाºया महापालिकेने आता जुन्या स्मार्ट नाशिक अ‍ॅपमध्ये बदल केला असून, एनएमसी ई कनेक्ट नावाचे नवे अ‍ॅप आणण्यात आले आहे. या अ‍ॅपवर केलेली तक्रार संबंधित विभागीय अधिकाºयाने चोवीस तासांत खुली न केल्यास ती आपोआप वरिष्ठांकडे जाईलच; परंतु त्याचबरोबर त्या विभागीय अधिकाºयाला आॅटो जनरेटेड शोकॉज नोटीस बजावण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटीमुळे डिजिटल यंत्रणेचा वापर करणाºया महापालिकेने आता जुन्या स्मार्ट नाशिक अ‍ॅपमध्ये बदल केला असून, एनएमसी ई कनेक्ट नावाचे नवे अ‍ॅप आणण्यात आले आहे. या अ‍ॅपवर केलेली तक्रार संबंधित विभागीय अधिकाºयाने चोवीस तासांत खुली न केल्यास ती आपोआप वरिष्ठांकडे जाईलच; परंतु त्याचबरोबर त्या विभागीय अधिकाºयाला आॅटो जनरेटेड शोकॉज नोटीस बजावण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.  महापालिकेने यापूर्वी स्मार्ट नाशिक हे अ‍ॅप तयार केले होते. त्यावर नागरिकांच्या तक्रारी करण्याची सोय होती. मात्र त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने नवीन अ‍ॅप तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपअभियंता मगर यांनी त्याचे सादरीकरणही केले. महापालिकेत डिजिटल तंत्रज्ञानाचा नागरी सेवेसाठी अधिकाधिक वापर करण्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अ‍ॅपमधील मुख्य मुद्दा तक्रारींचा आहे. मनपाच्या सेवेविषयी तक्रार असल्यास पूर्वी तक्रार करताना तक्रार कोणत्या विभागाविषयी आहे तसेच प्रभाग क्रमांक हे सर्व नमूद करावे लागत असे. परंतु आता नव्या अ‍ॅपमध्ये विभाग- प्रभाग नोंदवायची गरज नाही. सुरुवातीला एकदाच रजिस्ट्रेशन केल्यानंतर तक्रार करता येईल.तक्रार केल्यानंतर ती संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडे जाईल. त्यांनी ती चोवीस तासात खुली करणे अपेक्षित असून, तक्रारीचे निराकरण सात दिवसांत केले जाईल. त्यानंतर तक्रार क्लोज करताना त्यावर समाधान आहे किंवा नाही याची विचारणा केली जाईल अन्यथा तक्रार रिओपन करण्याचीदेखील व्यवस्था आहे. मात्र ती एकदाच रिओपन करता येईल. दुसºयावेळी ती क्लोज केली जाईल. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण केल्यानंतर त्याला रेटिंग आणि फिडबॅक देण्याची व्यवस्था आहे. रेटिंग आणि फिडबॅक न दिल्यास दुसºयावेळी पुन्हा त्याच व्यक्तीने तक्रार केल्यास त्याला अगोदर रेटिंग आणि फिडबॅक देणे बंधनकारक असेल. त्यानंतरच त्याची तक्रार घेता येईल. तक्रारकर्त्याने केलेली तक्रार चोवीस तासांत संबंधित विभागाच्या अधिकाºयाने ओपन न केल्यास ती आपोआप खातेप्रमुखाकडे जाईल आणि त्यावर ते कार्यवाही करतील. त्यांनी तक्रार ओपन न केल्यास थेट आयुक्तांकडे तक्रार पाठविली जाईल अशी तरतूद आहे. दखल न घेणाºया अधिकाºयांना आॅटो जनरेटेड शो कॉज नोटिसा बजावल्या जातील आणि त्याची नोंद सेवापुस्तकात केली जाईल.दर सोमवारी आढावामहापालिकेच्या नव्या अ‍ॅपमधील तक्रारींचे किती निवारण झाले किंवा नाही झाले या सर्व बाबींचा आढावा आयुक्त दर सोमवारी साप्ताहिक बैठकीत घेतील. त्याच बरोबर वेळेत तक्रारींची सोडवणूक न करणारे आणि फिडबॅकमध्ये चांगले गुण न मिळालेल्या अधिकाºयांवर वेतनवाढ किंवा पदोन्नती रोखण्यापर्यंत कारवाई होऊ शकेल, असे आयुक्त मुंढे यांनी सांगितले. महापालिकेच्या सुमारे पस्तीस ते चाळीस सेवा आॅनलाइन देण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच कार्यवाही होईल. महापालिकेच्या नियमित संकेतस्थळात बदल करण्यात येणार आहे. अ‍ॅपवरील तक्रारींचे कितपत निराकरण झाले, पेंडेन्सी आणि अन्य माहिती वेबपेजवर उपलब्ध असेल, असेही मुंढे यांनी सांगितले.घंटागाडीचा मिळणार अलर्र्टमहापालिकेच्या अ‍ॅपमध्ये आता घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोलचे ट्रॅकिंग करणे शक्य होणार आहे. अ‍ॅपमध्ये नागरिकाने घराचे लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर त्याला जीपीआरएसमुळे घंटागाड्या आणि पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी कोठे आहेत हे दिसू शकेल. त्याचबरोबर त्यात अलर्ट सिस्टीम असून, तो आॅप्शन सिलेक्ट केल्यास घंटागाडी घराजवळ आल्यास किती मिनिट अगोदर अर्लट हवा तो आॅप्शन द्यावा लागेल आणि त्यानुसार मग घरापासून सुमारे दहा मिनिटे अंतरावर घंटागाडी असताना मोबाइलवर अलर्ट दिला जाईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका