पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात पहिल्या पिंक व्हिलेज गावाची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गावी झाली. त्याची चर्चा राज्यात नाही तर देशात होत आहे. एवढेच नाही तर स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील त्या गावाला भेट देत आहेत. त्याच गावाचा आदर्श घेऊन व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पिंपळगाव देखील गुलाबी व हरित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल, अग्नी,वायू ,पृथ्वी आणि आकाश या पाच तत्त्वांचे संगोपन ह्या संकल्पनेमुळे सर्व गाव एकजूट झालेले आहेत, हे विशेष. गावातील सर्व जातीपातीच्या, धर्माच्या व राजकारणाच्या भिंती बाजूला सारत माझी वसुंधरा वाचवा यासाठी गाव एकजुटीने आपलं गाव आदर्श करण्याकडे वाटचाल करीत आहेत.सुरुवातीला गावातील अनेकांचा या उपक्रमाला विरोध होताच. परंतु सर्वांना पिंपळगाव शहराचा हरित क्रांतीत बदल दिसून आल्यानंतर मात्र सर्वांनी एकजुटीने या कार्यात हिरीरीने सहभाग घेतला आहे. पिंपळगाव शहर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्मार्ट शहराच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पिंपळगाव शहरातील भिंतीवर पर्यावरण संवर्धन संदेश लिहिला जात असून, यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होणार आहे. यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलून लवकरच स्मार्ट शहर म्हणून पिंपळगावची ओळख निर्माण होणार आहे.- गणेश बनकर, ग्रामपंचायत सदस्य.
आता पिंपळगाव होणार गुलाबी शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 8:40 PM
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्रात पहिल्या पिंक व्हिलेज गावाची निर्मिती नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भिंतघर या गावी झाली. त्याची चर्चा राज्यात नाही तर देशात होत आहे. एवढेच नाही तर स्वतः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील त्या गावाला भेट देत आहेत. त्याच गावाचा आदर्श घेऊन व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पिंपळगाव देखील गुलाबी व हरित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमाझी वसुंधरा अभियानातून ग्रामस्थांकडून पुढाकार