शहरात झपाट्याने कोरोनाचा फैलाव होत असून,. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिक भर पडत चालली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार विविध अस्थापनांना निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य आहे, मात्र तरीही सर्रासपणे परिमंडळ-१अंतर्गत असलेल्या मुख्य बाजारपेठांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होऊ लागल्या आहेत. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये आता परिमंडळ-१मधील बाजारपेठांमध्ये कारवाई केली जाणार असल्याचे तांबे म्हणाले. पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर, आडगाव या सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांकडून आता कठोरपणे कारवाई केली जाणार असून, नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानुसार आता वेळेत आस्थापना बंद न केल्यास सील करण्यात येणार आहे. तसेच दंडात्मक व कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. प्रत्येक दुकानासमोर सोशल डिस्टन्ससाठी पांढऱ्या रंगाने वर्तुळ आखण्याचे आदेश दिले आहेत.
---इन्फो---
पोलीस ठोठावणार दंड
मास्क नसल्यास पाचशे रुपयांचा दंड व कायदेशीर कारवाई, पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र दिसल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला जाणार असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबाधित होम क्वाॅरटांइन असल्यास त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार असून, प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोरोनाबाधित घराच्या, इमारतीच्या बाहेर आढळून आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. दंडासोबतच त्यांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात येणार आहे.