चांदोरी : कांद्याने प्रतिकिलो शंभर ते दीडशे रु पयांची सीमा पार केली असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भज्यांमधून कांदा हद्दपार झाला असून त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असून. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे.देशभर कांद्याची मागणी वाढत असून तो कमी प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस त्याच्या भावात वाढ होत आहे. मागील आठवड्यात ८० रु पये किलो असलेला कांदा या आठवड्यात १०० ते १५० प्रति किलो झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कांद्याने अक्षरश: डोळ्यात पाणी आणले आहे. खाद्य पदार्थात बटाटयाच्या बरोबरीत वापर होणार कांदा महागल्याने नागरिक त्याला पर्याय शोधत आहे.सकाळचा नाश्ता करण्यासाठी सगळीकडे हात गाड्यावर भजे पाव खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते .या गाड्यांवर कांदाभजी खाणार्यांची संख्या मोठी असते.अनेकांनी कांद्याऐवजी पत्ताकोबी,तसेच हिरव्या भाज्या भज्यांसाठी वापरणे सुरु केले आहे. कांद्याने मात्र भजे खाणारे व त्याचीविक्र ी करणारे यांची पंचाईत केली आहे . यांच्या मदतीला भोपळा धावून आला आहे. सध्या तरी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याने आणखी काही दिवस तरी नागरिकांना कांद्याशिवाय जेवण व नास्ता कतृत्व लागणार आहे.कांदा भजे विक्र ी करणारे अडचणीतमागील काही दिवसापासून कांद्याचे भाव वाढतच चालल्याने कांदा भजे विक्र ी करणारे चांगलेच अडचणीत सापडले. आहे. त्यामुळे कांदाऐवजी आता सहज उपलब्ध होणाºया व भावही कमी असणार्या भोपळ्याचा वापर भज्यांमध्ये करण्यात येत आहे. भज्यांत कांदा की भोपळा हे खाणाºयाच्या सहजासहजी लक्षात येत नाही.या विषयी गा्रहकाने तक्र ार केल्यास भोपळा आरोग्यास फायदेशीर असल्याचे सांगतात.
भज्यांसाठी आता भोपळ्यासह पत्ताकोबीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:57 PM
कांद्याने प्रतिकिलो शंभर ते दीडशे रु पयांची सीमा पार केली असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भज्यांमधून कांदा हद्दपार झाला असून त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असून. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे.
ठळक मुद्देकांद्याने केला वांधा; ग्राहकांना विक्रेते सांगतात भोपळ्याचे आरोग्यदायी महत्त्व