चौकट===
आंदोलनाचा इशारा
दरम्यान, प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असतानाही प्रतिसाद ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे खोटे कारण देऊन गोदावरी बंद करण्याच्या अथवा मनमाडऐवजी धुळ्यापर्यंत नेण्याच्या हालचाली रेल्वेने सुरू केल्याचा आरोप विविध प्रवासी संघटनांचे पदाधिकारी राजेश फोकणे, गुरुमितसिंग रावल, बाळासाहेब केदारे यांनी केला आहे. गाडी बंद करण्याच्या घाटामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी पंचवटी, राज्यराणी आणि गोदावरी या गाड्या आहेत. गोदावरी रद्द झाल्यास नोकरदार, व्यावसायिकांची अडचण होणार आहे. याआधी तपोवन गाडी वर्षभरापूर्वी नांदेडपर्यंत नेण्यात आली. राज्यराणीचीही तीच गत झाली आहे. तर पुण्याला जाण्यासाठी वेळ, पैसा खर्च वाचविणारी नाशिक-पुणे गाडी आता भुसावळवरून सुटत आहे. मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस गाडी त्वरित सुरू करावी अन्यथा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आंदोलन करू, असा इशारा प्रवासी संघटनांनी दिला आहे.