नाशिक : शहरातील अडीचशे कोटी रुपयांचे काम रद्द केल्याने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नाराज झालेल्या नगरसेवकांनी विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पुन्हा याच कामासाठी तगादा लावला आहे. मात्र, गरजेनुसारच रस्त्याची कामे करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली असून, आता या रस्त्यांच्या कामांची शास्त्रोक्त पद्धतीने खातरजमा करूनच कामे हाती घेणाार आहेत.महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रशासन फारसे गंभीर निकष पाळीत नाही. डांबरीकरण झाल्यानंतर तीन वर्षांनी त्या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण केले आवश्यक आहे, परंतु तसे होत नाही तर दुसरीकडे काही रस्त्यावर डांबरावर डांबरदेखील टाकले जात असते. त्यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रस्त्यांची कामे करताना काळजीपूर्वक त्याची छाननी करण्यासाठी पीआयएस करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही रस्त्यांची कामे करण्यापूर्वीच त्या रस्त्याची खरी अवस्था कशी आहे. त्यासाठी रफनेस इंडेक्सची अभियांत्रिकीमध्ये व्यवस्था आहे. रस्ता किती समतल आहे किंवा खडबडीत झाला आहे, त्याची चाचणी करता येते आणि अशा चाचणीनंतरच त्या रस्त्याची स्थिती कळते. त्यानंतर पीआयएस ही आणखी एक चाचणी आहे त्याअंतर्गत रस्ते दुरुस्त करताना आणखी बारकाईने रस्त्याची स्थिती कळते.आता नगरसेवकांकडून रस्त्यांची कामे करण्याची आणि त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे मात्र आयुक्त गमे यांनी रस्त्यांचा खर्च वाजवीच असला पाहिजे यासाठी नवे निकष लागू केले आहेत. महापालिकेच्या सर्व विभागीय अधिकाºयांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांच्या अखत्यारितील अभियंते रस्त्यांची तपासणी करणार असून, त्यानंतरच त्यावर पुढील कार्यवाही होईल.मंजूर सर्वच कामे करण्याची मागणीगेल्या वर्षी महपालिकेच्या महासभेत अचानक २५६ कोटी रुपये खर्च करून रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र, तदनंतर आलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कामे रद्द केली. त्यानंतर त्यांनी सुमारे ९५ कोटी रुपयांची कामे मंजूर करून त्याची कार्यवाहीदेखील सुरू केली होती. मात्र यापूर्वी मंजूर असलेली सर्वच कामे करावी, अशी नगरसेवकांची मागणी होती. मुंढे यांची बदली झाल्याने आता हीच मागणी गमे यांच्याकडे करण्यात येत आहे.
खातरजमा करूनच होणार आता रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 1:41 AM
शहरातील अडीचशे कोटी रुपयांचे काम रद्द केल्याने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर नाराज झालेल्या नगरसेवकांनी विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पुन्हा याच कामासाठी तगादा लावला आहे. मात्र, गरजेनुसारच रस्त्याची कामे करण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली असून, आता या रस्त्यांच्या कामांची शास्त्रोक्त पद्धतीने खातरजमा करूनच कामे हाती घेणाार आहेत.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांना आदेश : विभागनिहाय तपासणी