कार्यशाळा : अन्न सुरक्षाप्रणाली विषयी मार्गदर्शन
पंचवटी : कोणत्याही धार्मिक ठिकाणी प्रसाद तयार करताना तसेच त्याचे वितरण करताना यापुढे अन्न व औषधे विभागाच्या सुरक्षा मानकांचे निकष पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचे पालन करण्याचे आवाहन अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी यांनी केले.शहरातील विविध देवदेवतांची मंदिरे, विश्वस्त मंडळे, तसेच प्रसादविक्रे ते यांनी प्रसाद वितरण करतांना कोणती काळजी घ्यावी तसेच विषबाधा टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी यासाठी अन्न औषध प्रशासन यांच्या वतीने नवीन आडगाव नाक्यावरील स्वामी नारायण बँक्वेट हॉल येथे मंदिर, मठविश्वस्त तसेच प्रसादविक्रे ते व महाप्रसाद वाटप करणाºया मंडळांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोेलत होते. या कार्यशाळेस सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे, अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनीही मार्गदर्शन केले.नाशिक शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विविध देवदेवतांची मंदिरे आहेत.याशिवाय नाशिक हे धार्मिक क्षेत्र असल्याने दैनंदिन हजारो भाविक नाशिकला देवदर्शन करण्यासाठी येत असतात. नाशिकमध्ये दररोजच भाविकांना महाप्रसाद वाटप केला जातो. त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रसाद तयार झाले पाहिजे असे यावेळी आधिकाºयांनी सांगितले. महाप्रसाद वाटप करणारे मंदिरे तसेच प्रसादविक्रे ते यांनी प्रसाद वितरण करताना सुरक्षित अन्न विक्र ी तसेच शिजविणे याबाबत अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये घ्यायची काळजी व अन्न सुरक्षाप्रणाली अवगत करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अन्न शिजविण्यापासून अन्न वितरण करण्यापर्यंत काय काळजी घ्यावी याविषयीची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला श्री स्वामी नारायण मंदिर, कपालेश्वर मंदिर, इस्कॉन, सोमेश्वर मंदिर, भद्रकाली मंदिर, इच्छामणी मंदिर, जेडीसी बिटको, साई किरण धाम आदिंसह मंदिर, मठ तसेच मंदिरांचे विश्वस्त अन्न औषध प्रशासन विभागाचे व्ही. व्ही. कुंभोजकर, एस. डी. महाजन, एस. एस. पटवर्धन, आर. डी. सूर्यवंशी, सी. डी. राठोड, पी. एस. पाटील आदी उपस्थित होते.