नाशिक : ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन रिपब्लिकन पक्षाने आता राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू केली असून, नाशिकमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते सामाजिक समता अभियानाचे उद््घाटन करून त्याची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अपेक्षेने १९३० साली समता आंदोलन उभारले होते त्याचीच पुनरावृत्ती यानिमित्ताने करायची आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल २ मार्च २०१६ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, २ मार्च रोजी त्याचा समारोप गोल्फ क्लब मैदानावर करण्यात येणार आहे. समारोपप्रसंगी आंबेडकर चळवळीशी संबंधित सर्वच जाती धर्मातील १२५ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येणार असून, काळाराम मंदिरापासून ते गोल्फ क्लबपर्यंत भव्य रॅलीचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आठवले यांनी दिली. याप्रसंगी जिल्'ाध्यक्ष प्रकाश लोंढे, महानगरप्रमुख पवन क्षीरसागर, दीपक डोके आदि उपस्थित होते. सत्तेत लवकरच वाटा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला आहे. ते जेव्हा अमेरिकेतून येतील त्यानंतर आम्हाला सत्तेत वाटा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. विविध महामंडळांची पदे देतानाही पाच टक्के महामंडळ आमच्या वाटेला येणार असून, आम्ही त्याचे वाटप पक्षातील सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये करणार आहोत, असेही ते म्हणाले. सत्ता मिळण्यासाठी चळवळीतील सर्व गट तट एकत्र येणार असतील तर त्याच्या नेतृत्वाचीही अट मी ठेवली नसून ते एकत्र यावेत हीच माझी इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
आता रिपाइंचेही राज्यात सोशल इंजिनिअरिंग
By admin | Published: July 01, 2015 12:14 AM